शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

दोन 'वर्ल्ड क्लास' रेल्वेगाड्यांमुळे प्रवासाचा वेळ 20 टक्क्यांनी कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 06:00 IST

रेल्वेकडून सध्या चालविल्या जात असलेल्या रेल्वेगाड्यांपेक्षा अधिक वेगाने धावू शकणा-या व जागतिक दर्जाचे सारे निकष राखून बनविण्यात येणा-या दोन नव्या रेल्वेगाड्यांमुळे प्रवासाचा वेळ २० टक्क्यांनी कमी

चेन्नई : रेल्वेकडून सध्या चालविल्या जात असलेल्या रेल्वेगाड्यांपेक्षा अधिक वेगाने धावू शकणा-या व जागतिक दर्जाचे सारे निकष राखून बनविण्यात येणा-या दोन नव्या रेल्वेगाड्यांमुळे प्रवासाचा वेळ २० टक्क्यांनी कमी होईल.चेन्नई येथील रेल्वेच्या फॅक्टरीमध्ये या दोन ट्रेनच्या डब्यांचा आराखडा बनविण्यात आला आहे. याचे सर्व डबे वातानुकूलित असतील. त्यांना ट्रेन १८ व ट्रेन २० अशी नावे देण्यात आली आहेत. ट्रेन १८ मध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा असतील. या गाडीच्या १६ डब्यांची निर्मिती जूनपर्यंत पूर्ण होईल.या डब्यांमध्ये वाय-फाय, जीएसपीवर आधारित माहिती, इन्फोटेनमेन्ट, एलईडी लाइटचा वापर केलेले इंटेरिअर अशा सुविधा या डब्यांमध्ये असतील. शताब्दी ट्रेनना ज्याप्रमाणे एरोडायनॅमिक नोज आहे, तशाच प्रकारे ट्रेन १८चाही आराखडा बनविण्यात आला आहे. दोन शहरांतर्गत जलदगतीने प्रवास करण्यासाठी या ट्रेनचा वापर होईल.ट्रेन २० ही दुसरी गाडी २०२० साली सुरु करण्यात येईल. या गाडीतही जागतिक दर्जाच्या सुविधा आहेत. राजधानी एक्स्प्रेसधील सर्व सुविधा ट्रेन २०मध्येही असतील. राजधानी एक्स्प्रेसची जागा ट्रेन २० भविष्यात घेईल.दिल्ली-हावडा प्रवासाची वेळ साडेतीन तासांनी घटेल-नवीन तंत्रज्ञानाने बनविण्यात येणा-या या गाड्यांचा वेग अधिक असेल. त्या दिल्ली-हावडा दरम्यानचे १४४० किमीचे अंतर इतर गाड्यांहून साडेतीन तास आधीच पूर्ण करू शकतील. राजधानी व शताब्दी एक्स्प्रेस गाड्या ताशी १५० किमी वेगाने धावू शकतात, पण त्यांचा सरासरी वेग ताशी ९० किमी राहतो. नव्या रेल्वेगाड्या दरताशी १३० किमी वेगाने धावू शकणार असून, त्यांच्या वेगाची कमाल मर्यादा ताशी १६० किमीपर्यंत वाढविली जाऊ शकते. (प्रतिकात्मक छायाचित्र -  Source: Wikimedia Commons)

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे