शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
3
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
4
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
5
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
6
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
7
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
8
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
9
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
10
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
11
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
12
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
13
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
14
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
15
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
16
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
17
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
18
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
19
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
20
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
Daily Top 2Weekly Top 5

आता मुंबई ते दिल्ली प्रवास फक्त १० तासांत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 06:48 IST

एक्स्प्रेस ताशी १६० किमी वेगाने चालविण्याचे लक्ष्य, साडेसहा हजार कोटींचा खर्च अपेक्षित

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई ते दिल्ली राजधानी एक्स्प्रेसचा प्रवास १५ ऐवजी १० तासांत करण्याचे रेल्वे प्रशासनाचे लक्ष्य आहे. मुंबई ते दिल्ली राजधानी एक्स्प्रेसचा वेग वाढवण्यासाठी पुढील १०० दिवसांतील कृती आराखड्यात या संदर्भातील प्रकल्पांना मान्यता मिळवण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील आहे.पश्चिम रेल्वे मार्गावरून मुंबई ते दिल्ली रेल्वे मार्ग एकूण १ हजार ४८३ किमी इतका आहे. यासाठी सध्या १५ तासांचा अवधी लागतो. मात्र हे अंतर १० तासांत पार करता यावे यासाठी एक्स्प्रेस १३० ऐवजी ताशी १६० किमी वेगाने चालविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यासाठी ६ हजार ८०६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. रेल्वे मार्गातील सिग्नल यंत्रणा आणि इतर आधुनिक सुविधा निर्माण करण्यासाठी या पैशांचा वापर होईल.यासह नवी दिल्ली ते हावडा एक्स्प्रेस १ हजार ५२५ किमीचे अंतर पार करण्यासाठी १७ तासांऐवजी १५ तासांचा कालावधी लागावा यावरही रेल्वे प्रशासन काम करत आहे. यासाठी ६ हजार ६८४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पांना मंजुरी मिळाल्यानंतर ४ वर्षांत काम पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाला आहे.देशातील ५० स्थानकांचा पुनर्विकासदेशातील ५० स्थानकांचा पुनर्विकास केला जाईल. देशातील प्रत्येक मेल, एक्स्प्रेसचा वेग आणि क्षमता वाढविण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील आहे. भारतीय रेल्वेमध्ये अनुदानासह किंवा विनाअनुदान तिकीट काढण्याची सोय उपलब्ध असेल. याबाबत रेल्वे प्रशासन जागृती करणार असून मेल, एक्स्प्रेसमध्ये लोको पायलटसाठी अत्याधुनिक सुरक्षाव्यवस्था केली जाईल.६ हजार ४८५ रेल्वे स्थानकांवर वायफायसध्या देशातील १ हजार ६०३ रेल्वे स्थानकांवर वायफायची सुविधा उपलब्ध आहे. उर्वरित ४ हजार ८८२ रेल्वे स्थानकांवर वायफाय बसविण्यात येतील. त्यामुळे पुढील १०० दिवसांच्या कृती आराखड्यात ६ हजार ४८५ रेल्वे स्थानकांवर वायफाय असेल.

टॅग्स :Rajdhani Expressराजधानी एक्स्प्रेस