मोफत बससेवेचा लाभ घेण्यासाठी पुरुषाचा 'बुरखा' घालून प्रवास, असं उलगडलं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 13:53 IST2023-07-07T13:39:02+5:302023-07-07T13:53:20+5:30
जेव्हा बस स्टँडवरील ग्रामस्थांनी बुरखा परिधान केलेल्या व्यक्तीच्या हालचालीवरुन संशय व्यक्त केला

मोफत बससेवेचा लाभ घेण्यासाठी पुरुषाचा 'बुरखा' घालून प्रवास, असं उलगडलं सत्य
बंगळुरू - महाराष्ट्र सरकारने महिलांना एसटी महामंडळाच्या बसमध्ये तिकीट दरात ५० टक्के सवलत लागू केली आहे. तर, कर्नाटकमध्ये सत्तापालट झाल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांच्या सरकारने महिलांना मोफत बसप्रवास देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे, येथील महिलांना मोफत बसप्रवास मिळत आहे. मात्र, मोफत बससवेचा लाभ मिळवण्यासाठी एका पुरुषानेच चक्क बुरखा परिधान करुन परिवहन मंडळाच्या बसमधून प्रवास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी खोटी कागदपत्रे जमा केली जातात, खोटे आधार कार्ड, ओळखपत्र आणि रेशनकार्डही दाखवल्याच्या घटना यापूर्वी उघडकीस आल्या आहेत. मात्र, कर्नाटकच्या हुबळी शहरात एका व्यक्तीने मोफत सरकारी बससेवेचा लाभ घेण्यासाठी चक्क बुरखा परिधान करत बसमधून प्रवास केला. धारवाड जिल्ह्याच्या कुंडागोला तालुक्यातील सांशी बस स्टँडवर उघडकीस आली.
जेव्हा बस स्टँडवरील ग्रामस्थांनी बुरखा परिधान केलेल्या व्यक्तीच्या हालचालीवरुन संशय व्यक्त केला. त्यानंतर, याबाबत स्थानिक पोलिसांनी माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, आरोपीचा बुरखा काढून त्यामागील सत्य शोधले. आरोपीचे नाव वीरभद्रैय्या निंगय्या मठपती असून तो विजयपूर जिल्ह्याचा रहिवाशी आहे. तो येथे भीक मागण्यासाठी येतो. वीरभद्रैय्या यांच्याजवळ महिलेच्या आधार कार्डची एक प्रत सापडली आहे. याप्रकरणी, स्थानिक जनेतने आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केले.