शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
5
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
6
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
7
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
8
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
9
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
10
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
11
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
12
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
13
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
14
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
15
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
16
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
17
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
18
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
19
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
20
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप

बेळगावजवळ प्रशिक्षण विमान कोसळले, प्रशिक्षणार्थी पायलट किरकोळ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 12:23 PM

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

प्रकाश बेळगोजी

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील होन्नीहाळ ते बागेवाडी रोड दरम्यानच्या शेतात प्रशिक्षण विमान कोसळले. या दुर्घटनेत पायलटसह इतर जण जखमी झाले आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.बेळगाव विमानतळावरून सांबरा गावाजवळ प्रशिक्षण घेत असलेल्या छोट्या विमानाचे मोदगा- बागेवाडी रस्त्याच्या मध्यभागी होन्नीहाळ या गावच्या हद्दीत आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. या घटनेत प्रशिक्षकाच्या पायाला दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच मारीहाळ स्टेशन पोलिस आणि हवाई दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. याबाबत माहिती अशी की, बेळगाव विमानतळावर सुरू करण्यात आलेल्या रेडबर्ड वैमानिक प्रशिक्षण केंद्राच्या एका विमानाने आज, मंगळवारी सकाळी प्रशिक्षणासाठी हवाई उड्डाण केले होते. त्यानंतर सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास सांबरा गावाजवळ अवकाशात या विमानामध्ये बिघाड झाल्यामुळे मोदगा -बागेवाडी रस्त्याच्या मध्यभागी होन्निहाळ तालुक्याच्या हद्दीत विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. लँडिंग सुरळीत न झाल्याने विमान शेतात कोसळले.चाके तुटून विमानाचा अपघात झाला आणि या घटनेत प्रशिक्षकाच्या पायाला दुखापत झाली. सदर अपघाताची माहिती मिळताच मारीहाळ पोलिसांसह सांबरा हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर इजा अथवा जीवितहानी झाली नाही.

टॅग्स :Karnatakकर्नाटकbelgaonबेळगावbelgaum-pcबेळगावairplaneविमान