शहरं
Join us  
Trending Stories
1
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
2
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
3
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल
4
अदानी समूह करणार 'सहारा'च्या ८८ मालमत्तांची खरेदी? भारतातला सर्वात मोठा प्रॉपर्टी करार होण्याची शक्यता
5
अमानुष! आईसमोरच ५ वर्षांच्या लेकाची निर्घृण हत्या, काळीज पिळवटून टाकणारी घटना
6
चुकीच्या आजाराचं निदान, सुई टोचली आणि कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
7
५ ग्रहांचे गोचर, ५ राजयोग: १० राशींचे दसरा-दिवाळी दणक्यात, धनलक्ष्मी पैसा देणार, भरपूर लाभ!
8
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
9
सर्जरी करताना ऑपरेशन थिएटरच्या छताचं प्लास्टर कोसळलं; डॉक्टरने शेअर केला शॉकिंग Video
10
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
11
Navaratri 2025: कुमारिका पूजेसाठी योग्य तिथी आणि 'या' वयोगटातील मुलींना निवडा!
12
लाडक्या बहिणींना मिळणार १ लाखापर्यंत विशेष कर्ज; दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार
13
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
14
Indian Idol 12 फेम सायली कांबळे लवकरच होणार आई, सोशल मीडियावर दिली खुशखबर!
15
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
16
नवरात्री २०२५: अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकण्याने अंगात संचार होतो? काय आहे ही प्रथा?
17
नवीन ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांनो सावधान! तुम्हीही ‘तो’ फोटो शेअर केला का ?; समोर आलं मोठं संकट
18
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
19
Corona Virus : बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?

बेळगावमध्ये जवानांना दहशतवादाशी लढण्याचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 04:59 IST

बेळगाव : पारंपरिक युद्धाऐवजी आज लष्कराला बंडखोरी, दहशतवाद, घुसखोरी आणि नक्षलवाद या देशांतर्गत प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे.

निनाद देशमुख बेळगाव : पारंपरिक युद्धाऐवजी आज लष्कराला बंडखोरी, दहशतवाद, घुसखोरी आणि नक्षलवाद या देशांतर्गत प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे. त्यासाठी त्यांना आधुनिक प्रशिक्षणाची गरज आहे. बेळगावजवळील रोहिडेश्वर येथे असे प्रशिक्षण देण्यासाठी अत्याधुनिक सुविधांबरोबरच सीमेवरील भौगोलिक परिस्थितीचे प्रारूपही तयार करण्यात आले आहे, अशी माहिती बेळगाव येथील मराठा लाइट इन्फन्ट्रीचे कमांडिंग आॅफिसर ब्रिगेडियर गोविंद कलवड यांनी दिली.मराठा लाइट इन्फन्ट्रीच्या जवानांना देण्यात येणाºया प्रशिक्षणादरम्यान आयोजित प्रात्यक्षिक कार्यक्रमाच्या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. ब्रिगेडियर कलवड पुढे म्हणाले की, सीमावर्ती भागातील परिस्थितीचा विचार करून मराठा लाइट इन्फन्ट्रीमध्ये जवानांना मूलभूत प्रशिक्षणासोबतच अत्याधुनिक प्रशिक्षण दिले जात आहे. मराठा लाइट इन्फन्ट्रीमधील जवानांसोबत राष्ट्रीय रायफल्समध्ये भरती होणाºया जवानांना, तसेच मित्र देशांतील सैनिकांनाही या ठिकाणी ३४ आठवड्यांचे प्रशिक्षण देत आहे.>दहशतवादविरोधी कारवाईचे प्रात्यक्षिकदहशतवादाविरोधात कशा पद्धतीने कारवाई केली जाते, याचे प्रात्यक्षिक या वेळी दाखवण्यात आले. डोंगराळ भागांत घरामध्ये लपलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी हेलिकॉप्टरद्वारे जवानांची एक तुकडी खाली उतरली. लष्करी डावपेच आखत समन्वय साधत या दहशतवाद्यांचा खात्मा जवानांनी केला.>माजी सैनिक मेळावाबेळगाव येथील मराठा लाइट इन्फन्ट्रीला २०१८ मध्ये २५० वर्षे पूर्ण होत आहेत. हे वर्ष साजरे करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात निवृत्त अधिकारी आणि जवानांसाठी पेन्शन अदालत, माजी सैनिक मेळावा, हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान, असे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.