बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात आज (शुक्रवार ३ ऑक्टोबर) पहाटे एक भीषण अपघात झाला. जोगबनी-दानापूर वंदे भारत एक्सप्रेसने धडक दिल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात जबनपूरजवळ कटिहार-जोगबनी रेल्वे ट्रॅकवर घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व लोक दसरा मेळाव्यावरून परतत असताना रेल्वे ट्रॅक ओलांडत होते. त्याच वेळी वेगात आलेल्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनने त्यांना धडक दिली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना माहिती दिली. जखमींना तातडीने पूर्णिया येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे संरक्षण दलाचे कर्मचारी आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या मृत्यूचे नेमके कारण आणि अपघाताची परिस्थिती तपासण्याचे काम सुरू आहे.
एका आठवड्यात दुसरा अपघात
बिहारमध्ये एका आठवड्यात वंदे भारत एक्सप्रेसशी संबंधित हा दुसरा अपघात आहे. यापूर्वी, गेल्या महिन्यात ३० सप्टेंबर रोजी सहरसा येथील हटियागाची रेल्वे क्रॉसिंगजवळ एका तरुणाचा याच ट्रेनच्या धडकेने मृत्यू झाला होता.
Web Summary : A tragic accident in Bihar's Purnia district resulted in four fatalities and two critical injuries. The Vande Bharat Express struck the victims near Jabannpur as they crossed the tracks after a Dussehra gathering. Injured individuals were rushed to a local hospital, and investigations are underway.
Web Summary : बिहार के पूर्णिया जिले में एक दुखद हादसे में वंदे भारत एक्सप्रेस की चपेट में आने से चार लोगों की मौत हो गई और दो गंभीर रूप से घायल हो गए। यह दुर्घटना जबनपुर के पास हुई, जब लोग दशहरा कार्यक्रम से लौट रहे थे। घायलों को अस्पताल में भर्ती कराया गया है।