नवी दिल्ली : पंजाब-हरियाणाच्या शेतकऱ्यांनी खनौरी सीमेवर सुरू केलेले आंदोलन पुन्हा तापले असून, शेती उत्पादनांच्या किमान हमी भावास केंद्र सरकारची हमी मिळावी या मुख्य मागणीसाठी २६ जानेवारीला देशभर ट्रॅक्टर मोर्चे काढण्यात येणार आहेत.
दरम्यान, या मागणीसाठी ५३ दिवसांपासून उपोषण करणारे जगजितसिंग डल्लेवाल यांची प्रकृती खालावली असून, त्यांच्या प्रकृतीबाबत न्यायालयाने अहवाल मागवला आहे. डल्लेवाल यांच्या समर्थनार्थ उपोषण करणाऱ्या १०१ शेतकऱ्यांनीही चौथ्या दिवशी उपोषण सुरूच ठेवले.