शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 06:19 IST

श्रीनगरच्या उपनगरांमधील पर्वतरांगांच्या पायथ्याशी हाॅटेलमधील पर्यटकांवर हल्ला होण्याचे मिळाले होते संकेत, मात्र शोधमोहिमेसह सतर्कता बाळगूनही अखेर पहलगामचे अघटित घडलेच

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली/श्रीनगर : जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरच्या उपनगरांमध्ये विशेषतः झबरवान पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या हाॅटेलमध्ये थांबलेल्या पर्यटकांना दहशतवादी लक्ष्य करू शकतात, असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला होता अशी माहिती या प्रकरणाशी निगडित असलेल्या अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. त्यामुळे या भागातील सुरक्षेत वाढ करून डाचीगाम, निशात परिसरात मोठ्या प्रमाणावर झडती घेण्यात आली. मात्र काही संशयास्पद न आढळल्याने ही मोहीम २२ एप्रिल रोजी थांबविण्यात आली. नेमके त्याच दिवशी दहशतवाद्यांनी पहलगाममधील बैसरन घाटीत पर्यटकांवर गोळीबार करून २६ जणांची हत्या केली.

गुप्तचर यंत्रणांच्या इशाऱ्यानुसार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या सर्व परिसरावर लक्ष केंद्रित केले होते. त्या परिसरात हाती घेतलेल्या शोधमोहिमेत कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळून आली नाही. त्यामुळे २२ एप्रिल रोजी शोधमोहीम थांबविण्यात आली. त्याच दिवशी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. 

अधिकाऱ्यांनी सांगितले की,  बैसरन घाटी येथे दोन स्थानिक दहशतवादी पर्यटकांमध्ये मिसळले. त्यांनी गोळीबार करून काही पर्यटकांना एका फूड कोर्ट कॉम्प्लेक्समध्ये नेले. तिथे आणखी दोन पाकिस्तानी दहशतवादी होते. त्यांनी २६ जणांची हत्या केली. लोकांमध्ये भीती निर्माण व्हावी आणि देशात इतर ठिकाणी स्थानिक लोकांकडून काश्मिरी नागरिकांवर हल्ले व्हावेत, अशा हेतूनेही हा दहशतवादी हल्ला करण्यात आला.

‘त्या’ जवानाची सेवेतून हकालपट्टीश्रीनगर : पाकिस्तानी महिलेशी विवाह केल्याची माहिती दडवून ठेवल्याचा आरोप असलेला सीआरपीएफचा जवान मुनीर अहमदची सेवेतून हकालपट्टी केली आहे. त्याच्या या कृत्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी शनिवारी सांगितले. तो या दलाच्या ४१व्या बटालियनमध्ये कार्यरत होता. या जवानाने मीनल खान या पाकिस्तानी महिलेशी विवाह केला. व्हिसा संपला असतानाही ती भारतात राहत होती. या गोष्टी दडवून सेवा नियमांचा भंग केला असल्याचा त्याच्यावर ठपका ठेवला होता.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर