शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिपायाच्या जागेसाठी तब्बल 3 हजार 700 पीएचडीधारकांनी केला अर्ज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 14:04 IST

पात्रतेप्रमाणे नोकरी मिळत नसल्याने बेरोजगारीची समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे अशी बेरोजगार मंडळी तुलनेने कमी पात्रतेचे काम करण्यासाठीही तयार होत आहेत.

लखनौ -  पात्रतेप्रमाणे नोकरी मिळत नसल्याने बेरोजगारीची समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे अशी बेरोजगार मंडळी तुलनेने कमी पात्रतेचे काम करण्यासाठीही तयार होत आहेत. असाच प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडला आहे. येथे शिपायाच्या पदासाठी निघालेल्या 62 जागांसाठी हजारो अर्ज आले आहेत. त्यामधील सुमारे 3 हजार 700 अर्ज तर पीएचडी धारकांनी केले आहेत.  शिपाई/संदेशवाहकांच्या पदासाठीची पात्रता केवळ पाचवी पास आहे. मात्र असे असताना उनेक उच्चशिक्षितांनी या पदासाठी अर्ज केला आहे. 62 जागांसाठई एकूण 93 हजार अर्ज आले आहेत. त्यामधील केवळ 7 हजार 400 अर्जदारांचे शिक्षण पाचवी ते 12वीच्या दरम्यान आहे. उर्वरित अर्जधारकांमध्ये पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर तसेच बी. टेक, एम. टेक आणि एमबीए केलेल्या तरुणांचा समावेश आहे. पोलीस खात्यांमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिपाई/संदेशवाहकाची 62 पदे गेल्या 12 वर्षांपासून रिक्त आहेत. पोलीस खात्यातील या पदाचे काम पोस्टमनसारखे असते. या पदावरील नियुक्त व्यक्ती पोलिसांसाठी टेलिकॉम डिपार्टमेंटमधून पत्र आणि कागदपत्रे एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात पोहोचवण्याचे काम करतात. आता पर्यंत निवड करण्यासाठी आम्ही अर्जदारांकडून त्यांना सायकल चालवता येत असल्याचे सत्यापन करून घेत होते. मात्रा यावेळा मोठ्या प्रमाणावर उच्चशिक्षितांनी अर्ज केल्याने आम्हाला नाइलाजाने निवड चाचणी घ्यावी लागणार आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.   

टॅग्स :jobनोकरीUttar Pradeshउत्तर प्रदेशEmployeeकर्मचारी