केळी पीक विमा योजनेअंतर्गत अडीच कोटींचे वाटप
By Admin | Updated: December 22, 2014 23:11 IST2014-12-22T23:11:57+5:302014-12-22T23:11:57+5:30
अर्धापूर : तालुक्यातील शेतकर्यांना विविध बँकेमार्फत केळी पीक विम्याचे मंजूर झालेले जवळपास अडीच कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे़

केळी पीक विमा योजनेअंतर्गत अडीच कोटींचे वाटप
अ ्धापूर : तालुक्यातील शेतकर्यांना विविध बँकेमार्फत केळी पीक विम्याचे मंजूर झालेले जवळपास अडीच कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे़तालुक्यातील केळी पिकावर हवामानाचा परिणाम होवून २०१३-२०१४ या वर्षात झालेल्या नुकसानीबाबत केळी पीक विम्यांतर्गत स्टे बँक इंडियाच्या १८ कृषी खातेदारांना ४ लाख ४८ हजार रुपये मंजूर झाले़ स्टेट बँक ऑफ इंडिया मालेगाव शाखेच्या १३ कृषी खातेदारांना २ लाख २० हजार रुपये मंजूर झाले़ स्टेट बँक ऑफ हैदराबाद अर्धापूर शाखेच्या ८ कृषी खातेदारांना १ लाख ५२ हजार २५० रुपये, बँक ऑफ इंडिया अर्धापूर शाखेच्या ७० खातेदारांना २७ लाख १४ हजार ६००, महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा अर्धापूरच्या २३० खातेदारांना ५६ लाख ७५ हजार २५० रुपये, शाखा लहानच्या ४०८ कृषी खातेदारांना १ कोटी १२ लाख ३० हजार रुपये, मालेगावच्या ४३ कृषी खातेदारांना ७४ लाख ९० हजार रुपये मंजूर झाले़ खरीप हंगामात सुधारित पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी घोषित झाल्याने शासनाने टंचाईसदृश्य परिस्थिती जाहीर करून टाकली़ त्या अनुषंगाने महसुलात वुट, वीज बिलात सुट, परीक्षा शुल्कात माफी, कृषीपंपाची वीजतोडणी खंडीत न करण्याच्या उपाययोजना उपरोक्त शेतकर्यांना केळी पीक विम्याने दिलासा मिळाला आहे़कोटयावर्षी ४७५ कृषी खातेदारांनी केळी पीक विमा उतरविला असून त्यापोटी १६ लाख ७५ हजार रुपये विम्याची रक्कम भरली आहे - जी़जी़ चिवटे, शाखाधिकारी, महाराष्ट्र ग्रामीण बँक, अर्धापूऱ२०१३-१४ वर्षात मंजूर झालेल्या केळी पीक विम्याची रक्कम खातेदारांना वाटप करण्यात आली आहे - आऱआऱ चेन्नोजी, शाखा व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, अर्धापूऱशेतातील पीक उत्पादनात कमी आलेल्या उतार्यामुळे निराश शेतकर्यांना केळी पीक विम्याने दिलासा मिळाला - बळीराम पाटील इंगळे, शेतकरी, लहाऩ