छत्तीसगडच्या कांकेरमध्ये चकमक, ‎जोरदार धुमश्चक्री: जहाल नक्षल कमांडर 'रूपी' ठार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 12:20 IST2026-04-13T12:19:50+5:302026-04-13T12:20:18+5:30

पखांजूरच्या माचपल्ली जंगलात थरार

Top woman Maoist commander Rupi carrying Rs 5 lakh bounty killed in Chhattisgarh encounter | छत्तीसगडच्या कांकेरमध्ये चकमक, ‎जोरदार धुमश्चक्री: जहाल नक्षल कमांडर 'रूपी' ठार!

छत्तीसगडच्या कांकेरमध्ये चकमक, ‎जोरदार धुमश्चक्री: जहाल नक्षल कमांडर 'रूपी' ठार!

गडचिरोली: छत्तीसगडमध्ये माओवादविरोधी अभियानाला मोठे यश मिळत असून पखांजूर भागातील माचपल्ली जंगलात १३ एप्रिल रोजी सकाळी झालेल्या भीषण चकमकीत सुरक्षा दलाने जहाल माओवादी आणि मेढकी एलओएस  कमांडर रूपी हिला कंठस्नान घातले. रूपीच्या खात्म्यामुळे नक्षल्यांच्या नेटवर्कला मोठा हादरा बसला असून बड्या कॅडरचा प्रभाव आता ओसरू लागला आहे.

छत्तीसगडच्या बस्तर मध्ये शेवटच्या सहा जहाल माओवादी कमांडर साठी जवानांनी चक्रव्यूह रचले होते. काही माओवादी कांकेरमध्ये माचपल्ली भागात दडून बसल्याची सुरक्षा यंत्रणाला माहिती होती. त्यानुसार कांकेरचे पोलिस अधीक्षक निखिल बारेचा यांच्या मार्गदर्शनात जवानांनी सर्च ऑपरेशन सुरू केले होते. या दरम्यान १३ एप्रिल रोजी सकाळी  दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी गोळीबार सुरू केला. जवानांनी दिलेल्या चोख प्रत्युत्तरात जहाल नक्षली कमांडर रूपी ठार झाली. गेल्या अनेक दिवसांपासून जवान तिच्या शोधात होते. बस्तर भागात सक्रिय असलेल्या अनेक बड्या नेत्यांनी एकतर आत्मसमर्पण केले आहे किंवा ते चकमकीत मारले गेले आहेत. या भागातील 'रूपी' ही शेवटची मोठी कमांडर मानली जात होती.

‎अंगरक्षक रामकायने सोडली होती साथ

‎जहाल कमांडर रुपी हिची अंगरक्षक म्हणून रामकाय मंडावी ही काम पाहायची. आठवडाभरापूर्वी रामकायने कांकेर येथे शस्त्रासह शरणागती पत्करली होती. बॉडीगार्डने साथ सोडल्यामुळे रुपी अन्य कॅडरसोबत कांकेरच्या माचपल्ली जंगलात दडून बसली होती. खात्मा झाला. तिच्यावर पाच लाखांचे बक्षीस होते.

Web Title : छत्तीसगढ़ के कांकेर में मुठभेड़, खूंखार नक्सली कमांडर 'रूपी' ढेर!

Web Summary : छत्तीसगढ़ के कांकेर जिले में सुरक्षा बलों ने एक मुठभेड़ में खूंखार नक्सली कमांडर रूपी को मार गिराया। रूपी की मौत से बस्तर क्षेत्र में नक्सली नेटवर्क कमजोर हो गया है। उस पर पांच लाख का इनाम था। उसकी मौत से एक हफ्ते पहले उसके अंगरक्षक ने आत्मसमर्पण कर दिया था।

Web Title : Major Naxal Commander 'Rupi' Killed in Kanker Encounter, Chhattisgarh!

Web Summary : Security forces killed a key Naxal commander, Rupi, in Chhattisgarh's Kanker district. Rupi's death significantly weakens the Naxal network in the Bastar region. She had a bounty of five lakhs on her head. Her bodyguard surrendered a week before her death.