शहरं
Join us  
Trending Stories
1
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
2
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
3
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
4
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'
5
उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय?
6
भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?
7
१६०० वर्षांपासून हजारो लाकडाच्या खांबांवर उभं आहे युरोपमधील हे सुंदर शहर, असं आहे त्यामागचं गुपित
8
अमेरिका, ब्रिटनमध्ये पडझड, उद्या भारतात परिणाम दिसणार? सोने-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कोसळणार  
9
Video: शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास वसई किल्ल्यावर रोखले; परप्रांतीय सुरक्षा रक्षकाचा प्रताप
10
AUS vs IND 2nd ODI LIVE Streaming : टीम इंडियासाठी 'करो वा मरो'ची लढत! कशी पाहता येईल ही मॅच?
11
इंडिगो विमानाची वाराणसीत इमर्जन्सी लँडिंग, इंधनगळती झाल्याचे उघड, सर्व प्रवासी सुरक्षित
12
'आम्ही आमची धोरणं ठरवू; अमेरिकेवर अवलंबून राहण्याची गरज नाही', नेतन्याहूंची स्पष्टोक्ती
13
गे जोडीदाराने केला मित्राच्याच ६ वर्षांच्या लेकीवर बलात्कार, संतप्त पित्याने घेतला भयंकर बदला
14
महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?
15
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
16
फक्त 6 मिनिटांत सोनं 7,700 रुपयांनी घसरलं; चांदीलाही मोठा धक्का, जाणून घ्या नवीन दर...
17
Kagiso Rabada Record : रबाडाचा बॅटिंगमध्ये मोठा धमाका! पाकिस्तान विरुद्ध ११९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला
18
युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
19
आडनावामुळं टीम इंडियातून वगळलं? शमा मोहम्मद यांचा 'गंभीर' आरोप! माजी क्रिकेटर म्हणाला, असं कधीच...
20
भारतीय वंशाच्या फलंदाजाने पाकिस्तानला रडवले, शेवटच्या दोन खेळाडूंसह द. आफ्रिकेला सावरले

"सबका साथ, सबका विकास हे फक्त बोलण्यापुरतेच", 6500 कार्यकर्त्यांसह मोठ्या नेत्याने भाजपला ठोकला रामराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 08:13 IST

Hangsa Kumar : भाजप आणि सहयोगी पक्ष इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा (IPFT) च्या सुमारे 6,500 आदिवासींसह, हंगशा कुमार उत्तर त्रिपुरातील माणिकपूर येथे आयोजित एका जाहीर सभेत TIPRA मध्ये सामील झाले.

त्रिपुरामध्ये सत्ताधारी भाजपला मोठा झटका बसला आहे. आदिवासी नेते हुंगशा कुमार मंगळवारी आदिवासी-आधारित प्रमुख विरोधी पक्ष टिप्राहा (TIPRA) स्वदेशी प्रोग्रेसिव्ह प्रादेशिक आघाडीत सामील झाले. भाजप आणि सहयोगी पक्ष इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा (IPFT) च्या सुमारे 6,500 आदिवासींसह, हंगशा कुमार उत्तर त्रिपुरातील माणिकपूर येथे आयोजित एका जाहीर सभेत TIPRA मध्ये सामील झाले.

TIPRA सुप्रीमो आणि त्रिपुराचे माजी राजेशाही वंशज प्रद्योत बिक्रम माणिक्य देब बर्मन यांच्यासह इतर नेत्यांनी जाहीर सभेला संबोधित केले. ज्यात हजारो आदिवासी नागरिक उपस्थित होते. यावेळी हुंगशा कुमार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. सबका साथ, सबका विकास हे फक्त बोलण्यापुरतेच आहे. प्रत्यक्षात याचा परिणाम ना आदिवासींवर झाला, ना राज्यातील बिगर आदिवासींवर झाला, असे ते म्हणाले.

दरम्यान, हुंगशा कुमार सध्या 30 सदस्यीय त्रिपुरा आदिवासी क्षेत्र स्वायत्त जिल्हा परिषदेचे (TTAADC)  विरोधी पक्षनेते आहेत.  TTAADC ला मिनी-विधानसभा म्हटले जाते. TTAADC मध्ये भाजपचे नऊ सदस्य आहेत.  6 एप्रिल 2021 च्या निवडणुकीत TTAADC वर TIPRA ने सत्ता मिळवली होती.TIPRA ने गेल्या वर्षी राजकीयदृष्ट्या महत्त्वाची TTAADC ताब्यात घेतली, तेव्हा CPI(M) च्या नेतृत्वाखालील डावे, काँग्रेस आणि भाजप यांच्या नेतृत्वाखालील महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडीनंतर 2023 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्रिपुरामधील चौथी मोठी राजकीय शक्ती बनली.

'भाजप पुन्हा खोटी आश्वासने देणार'TIPRA मोथाचे प्रमुख प्रद्योत किशोर माणिक्य देबबर्मा म्हणाले की, भाजपने 2018 च्या निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने गेल्या 4.5 वर्षांत त्यांच्या कामात पूर्ण झाली नाहीत. 2023 मध्ये भाजपकडून पुन्हा खोटी आश्वासने दिली जातील. येत्या 15 दिवसांत भाजपचे दोन-तीन प्रमुख नेते मोथामध्ये सामील होतील, असेही ते म्हणाले.

'आमच्या पक्षावर प्रभाव पडणार नाही'हंगशा कुमार यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर भाजपचे मुख्य प्रवक्ते सुब्रत चक्रवर्ती म्हणाले, "आमचा शिस्तबद्ध कार्यकर्त्यांचा पक्ष आहोत. काही लोक बाजू बदलतात, त्यामुळे काही फरक पडत नाही. वैयक्तिक स्वार्थासाठी काम करणाऱ्या अशा लोकांचा आमच्या पक्षावर प्रभाव पडणार नाही. आम्ही आधी देशासाठी आणि नंतर पक्षासाठी काम करतो. त्यांनी भाजप का सोडली? हे त्यांना विचारायला हवे".

टॅग्स :BJPभाजपाTripuraत्रिपुरा