शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

टूथ पेस्ट, मुल्तानी माती अन् PPE किट, अश्रुधुराचा सामना करण्यासाठी असे देशी जुगाड करतायत शेतकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 18:58 IST

कुणी अश्रुधुरापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी टूथपेस्टचा लेप लावताना दिसत आहेत. कुणी मुलतानी मातीचा वापर करताना दिसत आहे, तर कुणी पतंगाच्या सहाय्याने, सुरक्षा दलांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या ड्रोनचा सामना करताना दिसत आहेत.

पंजाब आणि हरियाना दरम्यानच्या शंभू सीमेवर हरियाणा पोलिसांनी शेतकरी आंदोलकांना रोखले आहे. यासाठी अश्रुधुराचाही वापर करण्यात आला. शेतकरी आंदोलक सीमा ओलांडू शकले नाही. मात्र, हरियाणा पोलीस आणि निमलष्करी दलाकडून करण्यात येणाऱ्या कारवाईचा सामना करण्यासाठी या शेतकऱ्यांनी अफलातून देशी जुगाड शोधून काढले आहेत. कुणी अश्रुधुरापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी टूथपेस्टचा लेप लावताना दिसत आहेत. कुणी मुलतानी मातीचा वापर करताना दिसत आहे, तर कुणी पतंगाच्या सहाय्याने, सुरक्षा दलांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या ड्रोनचा सामना करताना दिसत आहेत.

आंदोलकांचे 'देशी जुगाड' -शेतकरी आंदोलकांना रोखण्यासाठी ड्रोनच्या माध्यमाने अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. मात्र, शेतकरी त्यांचा सामना करण्यासाठी पाण्याने भिजलेले पोते त्याव टाकून त्यांना निष्क्रिय करत आहेत. गॅसचा प्रभाव कमी करण्यासाठी शेतकरी स्प्रे पंपांचाही वापर करत आहेत. तसेच रबरी बुलेट्सपासून बचावासाठी शेतकऱ्यांनी फुल बॉडी प्रोटेक्टर परिधान केले आहेत. एवढेच नाही, तर रसायन युक्त पाण्याच्या फवाऱ्यांसापासून बचाव करण्यासाठी शेतकरी पीपीई किटचाही वापर करत आहेत.

मुल्तानी मातीचा वापर -याशिवाय, अश्रुधुरापासून बचाव करण्यासाठी अनेक जण चेहऱ्यावर मुल्तानी मातीचा लेपही लावत आहेत. तसेच टुथ पेस्टचा वापरही केला जात आहे. तसेच पाण्याच्या फवाऱ्यापासून बचाव करण्यासाठी ट्रॅक्टर्सना माॅडीफाय करण्यात आले आहे. त्यांना विशिष्ट प्रकारची शील्ड लवण्यात आले आहेत. अश्रुधुराचा सामना करण्यासाठी बाॅर्डरवर मोठे पंखेही लावण्यात आले आहेत. यांच्या सहाय्याने धुरापासून बचाव केला जाऊ शकतो.

महत्वाचे म्हणजे, स्प्रे पंपने पाण्याचा वर्षावर करण्यासाठी टँकरचीही व्यवस्था करण्यात आली आहे. भारतीय किसान यूनियन क्रांतिकारीचे प्रमुख रणजीत सिंह सवाजपूर यांनी म्हटले आहे की, मंगळवारी शेतकऱ्यांकडे जवळपास 50 टँकरची व्यवस्था होती. आता आणकी 30 टँकरची व्यवस्था कण्यात येत आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनagitationआंदोलनPoliceपोलिस