शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

चिखलात अंघोळ करा अन् शंख वाजवा, कोरोना आसपासही फिरकणार नाही; भाजपा खासदाराचा 'अजब' दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 17:07 IST

खासदारांचा हा सल्ला आता चर्चेचा विषय ठरला आहे.

ठळक मुद्दे याआधी भाभीजी पापड खाल्यामुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही, असे सांगणारे भाजपाचे खासदार अर्जुन मेघवाल यांनाच कोरोनाची लागण झाली आहे.

टोंक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी जगभरातील अनेक देशांकडून लस तयार करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, कोरोनाला पराभूत करण्यासाठी भाजपाचे अनेक नेते वेगवेगळे दावे करताना दिसत आहेत.

केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार अर्जुन मेघवाल यांनी भाभीजी पापड खाण्याचा सल्ला दिल्यानंतर आता कोरोना टाळण्यासाठी भाजपाच्या आणखी एका खासदाराने एक वेगळा सल्ला दिला आहे. चिखलात अंघोळ केल्याने आणि शंख वाजविल्यामुळे कोरोनापासून बचाव करता येईल, असा सल्ला  या खासदारांनी दिला आहे. खासदारांचा हा सल्ला आता चर्चेचा विषय ठरला  आहे.

राजस्थानमधील टोंक येथील भाजपा खासदार सुखबीरसिंह जौनपुरिया यांचा एक अजब व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ते चिखलात अंघोळ करत शंख वाजवताना दिसत आहेत. तसेच, व्हिडिओमध्ये ते असेही म्हणत आहेत की, "कोरोना ज्या दिवशी सुरू झाला होता, त्या दिवशी मी आपल्याला प्रतिकारशक्ती वाढवण्यास सांगितले होते. ही औषधे खाल्ल्याने वाढणार नाही. आपल्याला नैसर्गिक मार्गाने प्रतिकारशक्ती मिळेल. तुम्ही फिरायला जा, पावसात जा, चिखलात बसा. शेतातही काम करा, पायी चालत जा आणि शंख वाजवा, या गोष्टी प्रतिकारशक्ती वाढते."

कोरोना टाळण्यासाठी औषध खाण्याची नक्कीच गरज नाही, असे खासदार सुखबीरसिंह जौनपुरिया यांनी म्हटले आहे. स्वत: सुखबीरसिंह जौनपुरिया यांनी चिखलात अंघोळ करून आणि शंख वाजवून आपली प्रतिकारशक्ती वाढवल्याचा दावा केला आहे. तसेच, सुखबीरसिंह जौनपुरिया यांनी प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी चांगली पाने आणि कोरफड खाण्याचा सल्ला दिला.

दरम्यान, याआधी भाभीजी पापड खाल्यामुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही, असे सांगणारे भाजपाचे खासदार अर्जुन मेघवाल यांनाच कोरोनाची लागण झाली आहे. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानcorona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपा