थोमोसाठी
By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:26+5:302015-01-23T23:06:26+5:30
जनजागृती कार्यक्रम

थोमोसाठी
ज जागृती कार्यक्रमनांदेड- महात्मा गांधी व्यसनमुक्ती केंद्राच्यावतीने आदर्श हॉस्टेलवर व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला़ संदीप भिसे यांनी व्यसनाचे दूष्परिणाम सांगून व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले़ यावेळी जयचंद जाधव, रामराव पवार उपस्थित होते़ पोलिओ लसीकरणनांदेड- प्राथमिक आरोग्य केंद्र कापसी बु़ येथे पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम घेण्यात आला़ वैद्यकीय अधिकारी डॉ़मुनेश्वर, डॉ़पवार यांच्या हस्ते पोलिओ लस देण्यात आली़ इरवंत सूर्यकार, ढगे, मेजर, गायकवाड, गरूड, कळसे, मठपती आदींची उपस्थिती होती़ कृषि अधिक्षकांना निवेदननांदेड- पीटीओ म्हणून बोगस संस्थांची निवड केली असून सदरील निवड रद्द करण्यात यावी, अशी मागणी कृषिअधिक्षक यांना महात्मा फुले सेवाभावी संस्थेचे बालाजी गऊळकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे़ उपोषण करण्याचा इशराही निवेदनात दिला आहे़