शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

International Yoga Day 2020: कोरोनाच्या साथीमुळे आजचा योग दिन होणार डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 06:54 IST

२१ जून २0१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला, तेव्हापासून पहिल्यांदाच हा दिन आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर होणार आहे. योग दिनाच्या दिवशीच ‘वसंत संपात’ असतो.

नवी दिल्ली : कोविड-१९ साथीमुळे रविवारी सार्वजनिक गर्दी टाळून डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा होणार आहे.२१ जून २0१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला, तेव्हापासून पहिल्यांदाच हा दिन आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर होणार आहे. योग दिनाच्या दिवशीच ‘वसंत संपात’ असतो.एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘योगा अ‍ॅट होम, योगा विथ फॅमिली’ (घरच्या घरी योग, परिवारासोबत योग), असे यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे घोषवाक्य आहे. २१ जून रोजी सकाळी ७ वा. लोक या आभासी समारंभात आपापल्या घरूनच सहभागी होऊ शकतील. विदेशातील भारतीय दूतावासांकडून लोकांना डिजिटल माध्यमातून योग दिन उत्सवात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. त्यासाठी योग संस्थांची मदत घेतली जात आहे. यंदाच्या योगदिनी लेह येथे मोठा कार्यक्रम घेण्याची तयारी आयुष मंत्रालयाने केली होती. तथापि, साथीमुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावानुसार २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित करण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने ११ डिसेंबर २0१४ रोजी घेतला होता.आयुष मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यंदाच्या आंतरराष्ट्रीय योगदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश मुख्य आकर्षण राहणार आहे. कोविड-१९ साथीमुळे यंदा सार्वजनिक कार्यक्रमाला महत्त्व न देता लोकांकडून संपूर्ण कुटुंबासह आपापल्या घरूनच योग करून घेण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. पंतप्रधानांचा संदेश सकाळी ६.३0 वा. दूरचित्रवानी वाहिन्यांवरून प्रसारित केला जाईल. त्यांच्या संदेशानंतर मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेच्या वतीने ‘कॉमन योगा प्रोटोकॉल’ (सीवायसी) या नावाने ४५ मिनिटे योगाचे प्रात्यक्षिक दाखविले जाईल. विभिन्न वयोगट व समाजघटक लक्षात घेऊन सीवायसी प्रात्यक्षिके ठरविण्यात आली आहेत.आयुष मंत्रालयाने म्हटले आहे की, साथीच्या काळात योग अत्यंत उपयुक्त असल्याचे आढळून आले आहे. योगाच्या सरावामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य मजबूत होण्यास मदत होते. त्यातून माणसाची रोगप्रतिकारशक्ती वाढते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारीच एक व्हिडिओ संदेश जारी करून लोकांना आपापल्या घरूनच योग दिन साजरा करण्याचे आवाहन केले आहे. यंदाच्या योग दिनाची जोरदार पूर्वतयारी सरकारच्या वतीने करण्यात आली आहे.भारतीय दूतावासांच्या वतीने जगभरातील अनेक शहरांत आॅनलाईन कार्यक्रम होत आहेत.>रोगप्रतिकारशक्ती वाढीवर भरभारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे (आयसीसीआर) अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांनी या महिन्याच्या सुरुवातीला म्हटले होते की, यंदाच्या योगदिनी व्यक्तिगत पातळीवर रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याच्या मुद्यास महत्त्व दिले जाणार आहे. साथीच्या काळातील गरज लक्षात घेऊन या मुद्याला महत्त्व देण्यात आले आहे.

टॅग्स :YogaयोगInternational Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिन