बाबासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकाचे आज उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 05:15 IST2018-04-13T05:15:24+5:302018-04-13T05:15:24+5:30

घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यांना समर्पित महापरिनिर्वाण स्थळावरील राष्ट्रीय स्मारकाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी होणार आहे.

Today's inauguration of the National Monument of Babasaheb | बाबासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकाचे आज उद्घाटन

बाबासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकाचे आज उद्घाटन

- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यांना समर्पित महापरिनिर्वाण स्थळावरील राष्ट्रीय स्मारकाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी होणार आहे. दिल्लीतील अलीपूर रोड स्थित या स्मारकाच्या कामाचा शुभारंभ २०१६ मध्ये झाला होता. कायदा मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या ठिकाणी वास्तव्यास होते तेथे हे स्मारक उभारण्यात आले आहे.
याच ठिकाणी त्यांनी ६ डिसेंबर १९५६ रोजी अखेरचा श्वास घेतला. २६, अलीपूर रोड येथे त्यावेळी दिल्लीतील सिरोहीच्या महाराजांचे घर होते.

Web Title: Today's inauguration of the National Monument of Babasaheb