पंढरीनाथ लोटलीकर यांची आज जन्मशताब्दी

By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:13+5:302015-09-01T21:38:13+5:30

कोंकणी भवनात चित्रांचे प्रदर्शन : डॉ. हेगडे यांच्या हस्ते उद्घाटन

Today's birth centenary of Pandharinath Lotlikar | पंढरीनाथ लोटलीकर यांची आज जन्मशताब्दी

पंढरीनाथ लोटलीकर यांची आज जन्मशताब्दी

ंकणी भवनात चित्रांचे प्रदर्शन : डॉ. हेगडे यांच्या हस्ते उद्घाटन

मडगाव : कोंकणी भाषेजे जाज्वल्य प्रेमी व सामाजिक कार्यात योगदान दिलेले स्व. पंढरीनाथ शणै लोटलीकर यांची प्रथम जन्मशताब्दी आज 2 सप्टेंबर रोजी साजरी केली जाणार असून यानिमित्त मडगावच्या कोंकणी भवनात कलाकारांच्या कलाकृतीचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. सकाळी 9 वाजता प्रसिध्द मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र हेगडे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन केले जाणार आहे.
स्व. लोटलीकर यांचा जन्म 2 सप्टेंबर 1915 रोजी झाला होता. वकीलचे शिक्षण घेतलेले लोटलीकर यांनी पोतरुगीज प्रशासनात इश्कीरांव म्हणून काम केले होते. हे काम करताना ज्या ज्या गावात त्यांची नेमणूक झाली त्या त्या गावात बांध बांधणे, रस्ते तयार करणे, शेतांची व मानशींची दुरुस्ती, शाळा सुरु करणे आदी कित्येक सामाजिक कार्यात त्यांचा समावेश होता. कोंकणीचा विकास या ध्यासाने प्रेरित झालेले लोटलीकर यांनी कोंकणीचे स्वत:चे भवन असावे यासाठी मडगावातील आपली जमीन कोंकणी भाषा मंडळाला दान केली होती. याच जमिनीवर आज कोंकणी भवन उभे आहे.
याच शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून कोंकणी भाषा मंडळ व कॅनोपी आझूर या संस्थांनी 30 ऑगस्ट रोजी चित्रकारांची कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेतून तयार झालेल्या चित्रांचे प्रदर्शन आज कोंकणी भवनात मांडले जाणार आहे. (प्रतिनिधी)

ढँ3 : 0109-टअफ-10
स्व. पंढरीनाथ शणै लोटलीकर

Web Title: Today's birth centenary of Pandharinath Lotlikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.