Rajnath Singh Speech on Pahalgam: "मी चार दशकांपेक्षा जास्त काळापासून राजकारणात आहे. कधीही राजकारणाकडे शत्रूत्वाच्या नजरेने बघितले नाही. आज आम्ही सत्तेत आहोत, तर असे नाहीये की नेहमीच सत्तेत राहू. जनतेने जेव्हा आमच्यावर विरोधी पक्षाची जबाबदारी सोपवली, तेव्हा आम्ही ती सकारात्मक पद्धतीने पार पाडली", अशा शब्दात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधकांना लोकसभेत सुनावले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ऑपरेशन सिंदूरवर लोकसभेत सोमवारपासून चर्चा सुरू झाली. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चर्चेची सुरूवात करत ऑपरेशन सिंदूरबद्दल सविस्तर माहिती दिली.
"जेव्हा लक्ष्य मोठे असते, तेव्हा..."
लोकसभेत बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, "विरोध पक्षाचे लोक विचारत आहेत की, आपले किती लढाऊ विमाने पाडली गेली. हा प्रश्न जनभावनेचं योग्य पद्धतीने प्रतिनिधित्व करत नाही. त्यांना विचारायचंच असेल, तर त्यांनी आम्हाला विचारावं की, भारतीय लष्कराने शत्रूंची किती विमाने पाडले? त्यांनी प्रश्न विचारावा की, ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले आहे का? तर उतर आहे, हो", असे उत्तर राजनाथ सिंह यांनी विरोधकांना दिले.
"जेव्हा लक्ष्य मोठे असते, तेव्हा छोट्या मुद्द्यांकडे लक्ष दिलं नाही पाहिजे. त्यामुळे देशाची सुरक्षा, लष्कराच्या जवानांच्या सन्मान आणि उत्साहावरून लक्ष विचलित होऊ शकतं. विरोधी पक्ष ऑपरेशन सिंदूरबद्दल व्यवस्थित प्रश्न विचारत नाहीये, त्यामुळे काय उत्तर देऊ?", असे राजनाथ सिंह म्हणाले.
"आम्ही कायमच सत्तेत राहू असे नाही"
राजनाथ सिंह म्हणाले, "मी चार दशकांपेक्षा जास्त काळापासून राजकारणात आहे. कधीच राजकारणाकडे शत्रूत्वाच्या नजरेने बघितले नाही. आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही. जनतेने आमच्यावर जेव्हा विरोधी पक्षाची जबाबदारी सोपवली आणि आम्ही ती सकारात्मक पद्धतीने निभावली. आम्ही १९६२ मध्ये चीनसोबतच्या युद्धात वाईट परिणाम आला. तेव्हा आम्ही विचारले की दुसऱ्या देशाने आपल्या भूमीवर ताबा कसा मिळवला? आम्ही विचारलं की, जवान शहीद कसे झाले? आम्ही मशीन आणि तोफाची काळजी न करता देशाच्या भल्याचा विचार केला."
"१९७१ जेव्हा आपण पाकिस्तानला धडा शिकवला. आम्ही राजकीय आणि लष्करी नेतृत्वाचे कौतुक केले. अटल बिहारी वाजपेयी संसदेत उभे राहून त्यावेळच्या राजकीय नेतृत्वाचे कौतुक केले होते. आम्ही त्यावेळीही असे प्रश्न विचारले नाही. हाच मुद्दा आणि वास्तविक स्वरुपात सांगायचं झालं, तर परीक्षेत निकालच महत्त्वाचा असतो", असे उत्तर राजनाथ सिंह यांनी विरोधकांना दिले.