आज सिडनी, उद्या बेंगळूर... यात काही तथ्य नाही - पोलीस आयुक्त
By Admin | Updated: December 15, 2014 14:34 IST2014-12-15T14:34:33+5:302014-12-15T14:34:33+5:30
आज सिडनी उद्या बेंगळुरू असं सांगत लोकांमध्ये घबराट उत्पन्न करणे अत्यंत चुकीचे असल्याचे सांगत आम्ही अत्यंत सतर्क आहोत

आज सिडनी, उद्या बेंगळूर... यात काही तथ्य नाही - पोलीस आयुक्त
ऑनलाइन लोकमत
बेंगळुर, दि. १५ - आज सिडनी उद्या बेंगळुरू असं सांगत लोकांमध्ये घबराट उत्पन्न करणे अत्यंत चुकीचे असल्याचे सांगत आम्ही अत्यंत सतर्क आहोत आणि बेंगळुरू अत्यंत सुरक्षित असल्याचे बेंगळुरचे पोलीस आयुक्त एम. एन. रेड्डी यांनी सांगितले. वास्तविक ISIS ची खिल्ली उडवणा-या एका ट्विटर हँडलने उपहासानं असं आज सिडनी उद्या बेंगळुरू असं ट्विट केलं असल्याचं रेड्डी म्हणाले.
ISIS संदर्भातल्या बातम्या देणारे ट्विटर हँडल चालवणारा मेहदी मसरूर बिस्वास हा याला बेंगळूरमधून अटक केल्यामुळे सिडनीमधल्या घटनेचा संबंध बेंगळूरशी जोडण्यात आल्याचे दिसत आहे. बिस्वासच्या अटकेला दहशतवादी कारवाया करून प्रत्युत्तर देण्यात येईल असा हा अत्यंत जर-तर चा कयास असून वस्तुस्थिती तशी नसल्याचे बेंगळूरच्या पोलीस अधिका-यांनी सांगितले आहे.
आम्ही अत्यंत सतर्क आहोत आणि लोकांनी अजिबात घाबरू नये, प्रसारमाध्यमांनीही चुकीच्या बातम्या देऊ नये असे रेड्डी म्हणाले.