ँपान १ शार्प शूटरला आज मुंबई पोलीस नेणार
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:13+5:302015-02-18T00:13:13+5:30
पणजी : गोव्यात पकडलेला दाऊद गँगचा शार्प शूटर श्याम किशोर गरिकापी ऊर्फ ब्लॅक स्कॉर्पियॉन याला नेण्यासाठी मुंबईहून गोव्यात यायला निघालेले पोलिसांचे पथक मंगळवारी पणजीत पोहोचेल. मंगळवारीच त्याला मुंबई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.

ँपान १ शार्प शूटरला आज मुंबई पोलीस नेणार
प जी : गोव्यात पकडलेला दाऊद गँगचा शार्प शूटर श्याम किशोर गरिकापी ऊर्फ ब्लॅक स्कॉर्पियॉन याला नेण्यासाठी मुंबईहून गोव्यात यायला निघालेले पोलिसांचे पथक मंगळवारी पणजीत पोहोचेल. मंगळवारीच त्याला मुंबई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. गोव्यात भाड्याच्या बंगल्यात आठ वर्षे वास्तव्य करून असलेल्या दाऊद गँगमधील गँगस्टरला उद्या मुंबई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याची माहिती सीआयडीच्या सूत्रांकडून देण्यात आली. विशेष सुरक्षेत त्याला मुंबईला नेण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांना १९९० पासून हवा असलेला हा धोकादायक अतिरेकी गँगस्टर गोव्यात साळगाव येथे चोघमरोड जवळील बंगल्यात गोवा पोलिसांनी जेरबंद केला होता. आठ वर्षे हा माणूस गोव्यात होता; परंतु त्याची कुणालाही चाहूल लागली नव्हती. मुंबई पोलिसांनी ही माहिती मिळवून गोवा पोलिसांना कळविल्यानंतर नियोजनबद्ध कारवाई करून त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे पिस्तूल आणि महत्त्वाची कागदपत्रे सापडली आहेत.