शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Petrol-Diesel Price Hike: आजचा शेवटचा दिवस? पेट्रोल-डिझेल दरवाढ होण्याची शक्यता; युपीमध्ये अखेरच्या टप्प्यातील मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 08:11 IST

Fuel Price Hike: येत्या १० तारखेनंतर किंवा आजपासूनच भारतामधील पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये लीटरला १५ ते २२ रुपयांपर्यंत वाढ होण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क : रशिया आणि युक्रेनदरम्यान सुरू झालेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. सध्या बॅरलला ११८ डॉलरपर्यंत हे दर गेले असून, ते अधिक वाढण्याची भीती वर्तविली जात आहे. याचा परिणाम म्हणून येत्या १० तारखेनंतर किंवा आजपासूनच भारतामधील पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये लीटरला १५ ते २२ रुपयांपर्यंत वाढ होण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. कारण आज उत्तर प्रदेशमध्ये शेवटच्या टप्प्याचे मतदान होत आहे. मतदान संपताच दरवाढ करण्यास कंपन्या सुरु करू शकतात. 

निवडणूक आणि पेट्रोलचे दरभारतामधील पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये दररोज बदल होत असतो. मात्र, पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्यामुळे सध्या दर जैसे थे राहिले आहेत.१० मार्च रोजी पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होणार असून, निवडणूक आचारसंहिता संपणार आहे. त्यामुळे त्यानंतर देशातील इंधनाच्या दरामध्ये मोठी वाढ होऊ शकते. गेल्या १५ दिवसांमध्ये तेल कंपन्यांना झालेला तोटा भरून काढण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे.

जागतिक बाजारात भडकारशिया आणि युक्रेनदरम्यान युद्ध सुरू होण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचे दर बॅरलला ९७ डॉलर होते. ते आता वाढून ११८.१ डॉलर प्रतिबॅरल असे झाले आहेत. आगामी सप्ताहामध्ये हे दर १२५ डॉलर प्रतिबॅरलपर्यंत जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे भारतीयांच्या खिशाला इंधनाच्या दरवाढीची झळ सहन करावी लागणार, हे नक्कीच आहे. 

सरकार देऊ शकते काही सवलतदेशातील जनतेला इंधन भाववाढीचा मोठा  फटका बसू नये, यासाठी सरकारकडून काही प्रमाणामध्ये सवलत दिली जाऊ शकते. इंधनावरील अबकारी कराच्या दरामध्ये कपात करून सरकार वाढत्या किमतींना काही प्रमाणामध्ये आळा घालू शकते. 

मुंबईमध्ये सध्या पेट्रोल १०९.९८ रुपये, तर डिझेल ९४.१४ रुपये प्रति लीटर असे विकले जात आहे.

टॅग्स :Fuel Hikeइंधन दरवाढPetrolपेट्रोलUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२