शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

आज मोदी सरकारची अग्निपरीक्षा, सरकारविरोधात विरोधक मांडणार अविश्वास प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2018 09:01 IST

रकारमधून बाहेर पडलेल्या टीडीपीकडे एकूण 16 खासदार आहेत, तर वायएसआर काँग्रेसकडे 9 खासदार आहेत.

नवी दिल्ली -  आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवरुन मोदी सरकारविरोधात टीडीपी आणि वायएसआर काँग्रेस हे दोन्ही पक्ष आक्रमक झाले आहेत. आज संसदेत मोदी सरकारविरोधात हे दोन्ही पक्ष अविश्वास ठराव मांडणार आहेत.  वायएसआर काँग्रेसनंही रणशिंग फुंकल्यानं आणि विरोधक एकवटल्याने मोदी सरकारची डोकेदुखी वाढलीय. पण, लोकसभेतील संख्याबळाचा विचार केल्यास, या अविश्वास प्रस्तावामुळे केंद्र सरकारला फारसा धोका नसल्याचंच चित्र आहे. 

सरकारमधून बाहेर पडलेल्या टीडीपीकडे एकूण 16 खासदार आहेत, तर वायएसआर काँग्रेसकडे 9 खासदार आहेत. 34 खासदार संख्या असलेल्या तृणमूल काँग्रेसनेही ठरावाला समर्थन दिले आहे. म्हणजे ठराव मांडण्यासाठी लागणाऱ्या 54 खासदारांची संख्या पूर्ण झाली आहे. काँग्रेसही सोबत आल्यास या ठरावाला आणखी बळ मिळेल. शिवसेनेनेही अविश्वास ठरावादरम्यान तटस्थ राहण्याची घोषणा केली आहे. 

सद्यस्थितीत ५४३ सदस्यांच्या लोकसभेत ५३६ खासदार आहेत. त्यात एकट्या भाजपाचेच 273 खासदार आहेत. ही संख्या बहुमतापेक्षाही जास्त आहे. टीडीपीनं पाठिंबा काढून घेतल्यानंतर रालोआचं संख्याबळ ३१२ वर आलंय. या 'त्रिशतका'च्या जोरावर आज सरकार कुठलाही सामना जिंकू शकतं. त्यामुळे मोदी कंपनी निश्चिंत आहे.

राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा मित्र नसतो, या उक्तीचा प्रत्यय आज पुन्हा आला. गेल्या काही दिवसांपासून मोदी सरकारवर नाराज असलेल्या चंद्राबाबू नायडूंनी रालोआची साथ सोडली. आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मागणीला मोदी सरकारकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्यानं त्यांनी रालोआला राम-राम ठोकलाय आणि त्यांच्याशी आरपारचा लढा पुकारलाय. पण, संख्याबळाचं ब्रह्मास्त्र जवळ असल्यानं सरकारसाठी ही लढाई लुटूपुटूचीच आहे. 

अविश्वास प्रस्तावाला ५० खासदारांनी समर्थन दिलं तरच लोकसभेत हा प्रस्ताव मांडता येऊ शकतो. परंतु, तेलुगू देसम आणि वायएसआर काँग्रेसचं संख्याबळ पाहता, हा आकडा गाठणं त्यांच्यासाठी कठीणच आहे. काँग्रेसला सोबत घेऊन त्यांनी ही संख्या गाठली, तरी पुढे या प्रस्तावाचा टिकाव लागेल, अशी परिस्थिती आत्तातरी नाही. लोकसभेत अविश्वास प्रस्ताव आल्यास तटस्थ राहण्याची भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. म्हणजेच, त्यांचे १८ खासदार कुणाच्याही बाजूने मतदान करणार नाहीत. अकाली दलाचंही भाजपाशी बिनसलं असलं, तरी त्यांचे चार खासदार सरकारविरोधात मतदान करण्याचं पाऊल उचलतील, असं वाटत नाही.

टॅग्स :No Confidence motionअविश्वास ठरावNarendra Modiनरेंद्र मोदी