शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षापेक्षा विमान प्रवास स्वस्त; केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 10:51 IST

जयंत सिन्हा यांच्याकडून विमान आणि रिक्षा प्रवासाची तुलना

नवी दिल्ली : सध्याच्या घडीला विमान प्रवास रिक्षा प्रवासापेक्षा स्वस्त झाला आहे, असं केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये बोलत असताना सिन्हा यांनी रिक्षा आणि विमान प्रवासाची तुलना केली. सध्या अनेक विमान कंपन्यांनी तिकिटांचे दर कमी आले आहेत. त्याचा संदर्भ देत सिन्हा यांनी विमान प्रवास किफायतशीर झाल्याचं सांगितलं.सोमवारी जयंत सिन्हा टर्मिनल भवनचं उद्घाटन करण्यासाठी गोरखपूरला आले होते. त्यावेळी त्यांनी रिक्षा आणि विमान प्रवासाच्या दरांची तुलना केली. 'मी तुमच्यासमोर काही आकडे सांगू इच्छितो. त्यावरुन विमान उड्डाण क्षेत्रात कशी क्रांती घडली आहे, याची कल्पना तुम्हाला येईल', असं सिन्हा यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटलं. यानंतर त्यांनी विमान आणि रिक्षा प्रवासाच्या भाड्याची तुलना केली. 'आज दोनजण रिक्षानं गेल्यास 10 रुपये प्रति किलोमीटरच्या दरानं प्रवास भाडं देतात. म्हणजे एका व्यक्तीला एक किलोमीटर प्रवासामागे 5 रुपये इतका खर्च येतो. मात्र तुम्ही हवाई प्रवास करत असाल, तर तुम्हाला एक किलोमीटर प्रवासासाठी फक्त 4 रुपये द्यावे लागतात,' अशी आकडेवारी त्यांनी सांगितली. देशातील दळणवळण क्षेत्रात क्रांती होत असल्याचं जयंत सिन्हा यांनी केली. 'विमान वाहतूक क्षेत्रात घडलेली क्रांती डोळ्यात भरणारी आहे. यामुळे प्रवासी वाहतूक अतिशय स्वस्त झाली आहे. भाजपा सत्तेत येण्याआधी देशांतर्गत प्रवास करणाऱ्यांची संख्या 6 कोटी इतकी होती. या वर्षाच्या अखेरपर्यंत हा आकडा 12 कोटींवर जाईल. देशातील विमानतळांची संख्यादेखील 75 वरुन 100 वर पोहोचली आहे,' असं सिन्हा यांनी सांगितलं. 'आधी रांचीत 8-10 विमानं यायची. आता तिथे 30 विमानांची ये-जा होते. अलाहाबाद, कानपूर, जेवर, गोरखपूर या विभागांचाही वेगानं विस्तार होत आहे,' अशी माहिती त्यांनी दिली. 

टॅग्स :Jayant Sinhaजयंत सिन्हाairplaneविमानAirportविमानतळ