शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

'Dolo-650 ची विक्री वाढवण्यासाठी कंपनीनं डॉक्टरांना वाटले 1000 कोटींचे गिफ्ट्स', याचिकाकर्त्याचा SC मध्ये दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 23:34 IST

याचिकाकर्त्या फेडरेशन ऑफ मेडिकल अँड सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनच्या वतीने वकील सजंय पारिख यांनी ही माहिती न्यायालयाला दिली आहे.

कोरोना महामारीच्या काळात अत्यंत लोकप्रीय झालेल्या Dolo-650 ची विक्री वाढवण्यासाठी कंपनीकडून डॉक्टरांना 1000 कोटींहून अधिकचे गिफ्ट्स वाटण्यात आले. उपचारासाठी रुग्णांच्या प्रस्क्रिप्शनवर याच औषधाचे नाव लिहावे, असा यामागचा हेतू होता, असा दावा याचिकाकर्त्याच्या वकिलाने केला आहे.

याचिकाकर्त्या फेडरेशन ऑफ मेडिकल अँड सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनच्या वतीने वकील सजंय पारिख यांनी ही माहिती न्यायालयाला दिली आहे. यावेळी संजय पारिख यांनी सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सच्या (CBDT ) रिपोर्टचा हवाला दिला आहे. यावेळी पारिख म्हणाले, तापेच्या रुग्णांना डोलो- 650 चे नाव सुचवण्यासाठी एक हजार कोटी रुपयांहून अधिकचे गिफ्ट्स डॉक्टरांना वाटण्यात आले.

जस्टिस चंद्रचूड यांनी व्यक्त केलं आश्चर्य - वकिलाने केलेल्या या दाव्याने, प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या जस्टिस चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाला विचारात टाकले. यावर, वकील संजय पारिख यांना उद्देशून जस्टिस चंद्रचूड म्हणाले, 'आपण जे बोलत आहात, ते ऐकताना मला वाईट वाटत आहे. हे तेच औषध आहे, ज्याचा वापर कोरोना काळात मी देखील केला. मलाही हेच औषध घ्यायला सांगण्यात आले होते. हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. महत्वाचे म्हणजे, विक्री वाढविण्यासाठी डॉक्टरांना गिफ्ट्स वाटणाऱ्या औषध कंपनीची जबाबदारीही निश्चित करण्यात यावी, अशी मागणीही सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत करण्यात आली आहे. फेडरेशन ऑफ मेडिकल अँड सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनकडून दाखल करण्यात आलेल्या या याचिकेत म्हणण्यात आले आहे, की अशा प्रकरारच्या प्रकरणांत भ्रष्टाचारासाठी डॉक्टरांवर तर केस चलते, मात्र, औषध निर्माता कंपन्या वाचतात. 

न्यायालयाने मागितले सरकारकडे उत्तर -सुनावणीदरम्यान केंद्र सरकारकडून ASG एम नटराज यांनी बाजू मांडली. यावेळी, न्यायालयाने याचिकेतील मागण्यांवर  केंद्र सरकारकडे एका आठवड्यात उत्तर मागितले आहे. यामुळे आता 10 दिवसांनंतर हे प्रकरण सुनावणीसाठी समोर येईल.

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयcongressकाँग्रेस