शहरं
Join us  
Trending Stories
1
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
2
"बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ?
3
"मी हे मान्यच करू शकत नाही..."; टीम इंडियाच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजाराने चांगलंच सुनावलं
4
५ वर्षांत ५३०० टक्के रिटर्न; आता 'हा' शेअर पुन्हा सुस्साट! सातत्यानं लागतंय अपर सर्किट, कारण काय?
5
भारताचा अमेरिकेसोबत ऐतिहासिक LPG करार; घरगुती गॅस सिलिंडरची किंमत कमी होणार?
6
Protest: आधी ‘शेल्टर’ची व्यवस्था करा, नंतरच श्वानांना हात लावा; प्राणीमित्र संघटना रस्त्यावर!
7
गौतम अदानी आणताहेत देशातील सर्वात मोठा राइट्स इश्यू; ७१६ रुपये स्वस्त मिळतोय शेअर, पाहा डिटेल्स
8
खळबळजनक! थारसाठी पत्नीची हत्या, हुंड्यासाठी पती झाला हैवान; भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
9
SIR च्या कामाचा भार असह्य; वरिष्ठाच्या धमक्यांना कंटाळून शिक्षकाची रेल्वेखाली उडी, एकाच दिवशी दोन कर्मचाऱ्यांचे टोकाचे पाऊल
10
Ritual: पानाच्या टपरीवर का असते शंकराची पितळी मूर्ती? धार्मिक मान्यता की आणखी काही?
11
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
12
सुश्मिता सेनने पूर्ण शुद्धीत राहूनच केलेली अँजिओप्लास्टी, दोन वर्षांपूर्वी आलेला हार्टॲटॅक
13
काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; पूल कोसळून ३२ जणांचा मृत्यू, अनेक जण अजूनही बेपत्ता
14
आई वडिलांची एक चूक नडली, मुलाला झाला गंभीर आजार; हाताचे बोट कापावे लागले, कारण काय?
15
Delhi Blast : दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे
16
टॅक्स भरणे झाले सोपे! बँक, नेट बँकिंगचा झंझट नाही; आता UPI ॲपद्वारे मिनिटांत भरा प्राप्तीकर
17
पालघर साधू हत्याकांडात आरोप केले, त्यालाच पक्षात घेतले? चौफेर टीका होताच भाजपानं दिलं असं स्पष्टीकरण
18
देवेंद्र फडणवीसांना भेटला, सत्कार करून घेतला; पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणणारा निघाला...
19
नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी सुवर्णसंधी! ९०% कंपन्या 'या' पदावर प्रोफेशनल्सची करणार भरती
20
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगालचे नाव बदलणार; ममता बॅनर्जींच्या खासदाराची मोर्चेबांधणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 11:03 IST

पश्चिम बंगालधील ममता बॅनर्जी सरकारने त्यांच्या विधानसभेमध्ये जुलै 2018 मध्ये पश्चिम बंगालचे नाव बदलून बांग्ला करण्याचा प्रस्ताव संमत केला होता.

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असून तणावाचे वातावरण आहे. यामुळे पश्चिम बंगालचे राज्यपाल विधानसभेचे गेट बंद केल्याने उपोषणाला बसल्याचा प्रकार घडला होता. पश्चिम बंगालचे नामांतर बांग्ला करण्याच्या ममता बॅनर्जी यांच्या प्रस्तावाला जुलै महिन्यात दिल्लीत फेटाळण्यात आले होते. आता पुन्हा राज्य सभेत खासदाराने हा प्रस्ताव मांडला आहे. 

पश्चिम बंगालधील ममता बॅनर्जी सरकारने त्यांच्या विधानसभेमध्ये जुलै 2018 मध्ये पश्चिम बंगालचे नाव बदलून बांग्ला करण्याचा प्रस्ताव संमत केला होता. यानंतर हा प्रस्ताव केंद्राच्या गृह मंत्रालयाकडे पाठविला होता. मात्र, वर्षभराने यांवर भाजपा सरकारने असे राज्याचे नाव बदलता येणार नसल्याचे सांगितले होते. 

बॅनर्जी सरकारने पाठविलेल्या प्रस्तावात तीन वेगवेगळी नावे देण्यात आली होती. बंगाली मध्ये बांग्ला, इंग्रजीमध्ये बेंगाल आणि हिंदीमध्ये बंगाल अशी तीन नावे मुंजुरीसाठी दिली होती. मात्र, केंद्राने यावर अशी तीन तीन नावे देता येणार नसल्याचे सांगत हा प्रस्ताव फेटाळला होता. तसेच नामांतरासाठी संविधानामध्ये बदल करावे लागणार असल्याचे सांगितले होते. 

यामुळे आज तृणमूल काँग्रेसचे खासदार शंतनू सेन यांनी राज्यसभेमध्ये पश्चिम बंगालचे नाव बदलून बंगाल करण्याचा प्रस्ताव शून्य प्रहरामध्ये मांडला आहे. एकच नाव देण्यास सांगितल्याने पश्चिम नाव वगळून केवळ बंगाल ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 

 

 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालRajya Sabhaराज्यसभाMamata Banerjeeममता बॅनर्जी