शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

"माझी पक्षात घुसमट होतेय"; तृणमूल खासदाराची राज्यसभेत राजीनाम्याची घोषणा

By देवेश फडके | Published: February 12, 2021 3:06 PM

राज्यसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत तृणमूल काँग्रेसचे सदस्य खासदार दिनेश त्रिवेदी यांनी सहभाग घेतला. दिनेश त्रिवेदी यांना बोलण्याची संधी मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत अचानक राजीनामा देत असल्याची घोषणा केली.

ठळक मुद्देतृणमूल काँग्रेसचे खासदार दिनेश त्रिवेदी यांचा राजीनामाराज्यसभेत चर्चेदरम्यान भावना व्यक्त करत राजीनामाची घोषणाममता बॅनर्जींना मोठा धक्का पे धक्का

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी आज (शुक्रवार) राज्यसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान राजीनामा देण्याची घोषणा केली. ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. (tmc rajya sabha member dinesh trivedi announces resignation during debate on budget) 

राज्यसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत तृणमूल काँग्रेसचे सदस्य खासदार दिनेश त्रिवेदी यांनी सहभाग घेतला. दिनेश त्रिवेदी यांना बोलण्याची संधी मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत अचानक राजीनामा देत असल्याची घोषणा केली. दिनेश त्रिवेदी लवकरच भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

काय म्हणाले दिनेश त्रिवेदी?

वास्तविक पाहता जन्मभूमीसाठी आम्ही काम करत आहोत. आता सहन होत नाही. पक्षात अनेक मर्यादा येत आहेत. नेमके काय करावे हेच सूचत नाही. माझी आता घुसमट होतेय. तेथे अत्याचार होताना दिसत आहेत. मात्र, आम्ही काहीही करू शकत नाही. आता बंगाली जनतेमध्ये जावे, हा अंतरात्म्याचा आवाज आहे. त्यामुळे या क्षणी येथे चर्चेला उभा असताना राजीनामा देत आहे. देशासाठी आणि बंगलाच्या जनतेसाठी नेहमी पुढाकार घेऊन काम केले आहे आणि यापुढेही करत राहीन, असे त्रिवेदी यांनी राज्यसभेत बोलताना सांगितले. 

श्रीमान शाहा तुमच्या मुलाचं काय? ममता बॅनर्जींचा अमित शाहांना बोचरा सवाल

भाजपमध्ये प्रवेशाची दाट शक्यता

गेल्या अनेक दिवसांपासून दिनेश त्रिवेदी तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देतील, असा कयास होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश त्रिवेदी लवकरच तृणमूल काँग्रेसमधून राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. दिनेश त्रिवेदी यांनी भर राज्यसभेत बोलताना केलेली राजीनाम्याची घोषणा ममता बॅनर्जी यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी शुभेंदू अधिकारी, मुकुल घोष, राजीव बॅनर्जी यांसारख्या बड्या नेत्यांनी तृणमूल काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाPoliticsराजकारणtmcठाणे महापालिकाBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशन