शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

Hathras Case : तृणमूल काँग्रेसच्या खासदारांना पोलिसांची धक्काबुक्की; मीडियालाही गावात जाण्यास बंदी

By ravalnath.patil | Published: October 02, 2020 2:36 PM

Hathras Case : हाथरसमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी जाण्यास सर्वांनाच मज्जाव केला आहे.

ठळक मुद्देआम्हाला जाऊ द्या, आम्ही सर्व नियमांचे पालन करू, अशी विनंती तृणमूल काँग्रेसच्या प्रतिनिधी मंडळाने पोलिसांना केली.

हाथरस : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदारांना आज पोलिसांनी अडवले. मात्र, यावेळी आम्ही पीडित कुटुंबीयांना भेटणारच यावर अडून राहिलेले तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन हे पोलिसांच्या धक्काबुक्कीत खाली कोसळले.

दरम्यान, हाथरसमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी जाण्यास सर्वांनाच मज्जाव केला आहे. याठिकाणी नेते आणि मीडियाला सुद्धा तेथे जाण्यास मनाई करण्यात आली आहे. यातच तृणमूल काँग्रेसच्या प्रतिनिधी मंडळाने शुक्रवारी पीडित कुटुंबाची भेट घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखले. 

आम्हाला जाऊ द्या, आम्ही सर्व नियमांचे पालन करू, अशी विनंती तृणमूल काँग्रेसच्या प्रतिनिधी मंडळाने पोलिसांना केली. तरीही, पोलिसांनी त्यांना जाण्यास परवानगी दिली नाही. त्यानंतरही पीडित कुटुंबाला भेटायला जाण्यासाठी तृणमूल काँग्रेसचे प्रतिनिधी मंडळ ठाम राहिले. यावेळी खासदार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आणि नंतर झालेल्या धक्काबुक्कीत खासदार डेरेक ओ ब्रायन यांचा तोल जाऊन खाली कोसळले.

पोलिसांनी गैरवर्तन केल्याचा आरोपहाथरसमध्ये पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी केले असता उत्तर प्रदेश पोलिसांनी गैरवर्तणूक केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या खासदार ममता ठाकूर यांनी केला आहे. आम्ही पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी जात होतो, मात्र आम्हाला परवानगी देण्यात आली नाही. ज्यावेळी आम्ही जाण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी पोलिसांनी गैरवर्तन करत धक्काबुक्की केली आणि प्रतिनिधी मंडळावर लाठीचार्ज केला, असे खासदार ममता ठाकूर यांनी सांगितले.

राहुल गांधींना धक्काबुक्की, रस्त्यावर कोसळलेहाथरसच्या पीडित कुटुंबीयांना भेटण्याचा प्रयत्न करणारे राहुल गांधी हे काल पोलिसांच्या धक्काबुक्कीत खाली कोसळले. राहुल गांधी यांनी पोलिसांनी लाठीचार्ज करुन आपल्याला खाली पाडले असल्याचे म्हटले होते. तसेच "पोलिसांकडून मला धक्काबुक्की करण्यात आली. लाठीचार्ज करुन मला खाली पाडले. फक्त मोदीच या देशात चालू शकतात का? सर्वसामान्य व्यक्तीला ही परवानगी नाही का?, आमची गाडी थांबवण्यात आली म्हणूनच चालत निघालो होतो" असे देखील काल म्हटले होते. तसेच पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप केला. 

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारUttar Pradeshउत्तर प्रदेशtmcठाणे महापालिका