शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 18:39 IST

Lok Sabha Election 2024 : टीएमसीने आपल्या तक्रारीत संदेशखळीच्या महिलांविरुद्ध खोटेपणा, फसवणूक, गुन्हेगारी धमकी आणि गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप केला आहे.

Sandeshkhali sting video row : लोकसभा निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालमधील संदेशखळीच्या मुद्द्यावरून सुरू असलेला वाद थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. संदेशखळीच्या स्टिंग ऑपरेशनचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) राष्ट्रीय महिला आयोगाच्या (एनसीडब्ल्यू) अध्यक्षा रेखा शर्मा आणि स्थानिक भाजपा नेत्यांविरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून फौजदारी कारवाईची मागणी केली. 

टीएमसीने आपल्या तक्रारीत संदेशखळीच्या महिलांविरुद्ध खोटेपणा, फसवणूक, गुन्हेगारी धमकी आणि गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप केला आहे. टीएमसीने निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, "बलात्काराची खोटी तक्रार नोंदवण्यासाठी आणि कोऱ्या कागदावर स्वाक्षरी घेण्यासाठी दबाव आणण्याचे हे कृत्य केवळ कायदा आणि अधिकारांचा गैरवापरच नाही, तर खोटेगिरी आणि फसवणूक यांसारख्या गुन्ह्यांसारखे आहे." याप्रकरणी टीएमसीने एनसीडब्ल्यूच्या अध्यक्षा रेखा शर्मा, प्रियाली दास आणि इतर भाजपा नेत्यांवर निवडणूक आयोगाकडे फौजदारी कारवाईची मागणी केली आहे. तसेच, साक्षीदारांना आणखी धमकावणे आणि खोट्या आरोपांचा प्रसार रोखण्यासाठी सूचना जारी करण्याची मागणी टीएमसीने  निवडणूक आयोगाकडे केली आहे.

महिलांना आपल्या तक्रारी मागे घेण्यास भाग पाडण्यात आल्याचा दावा एनसीडब्ल्यूने केला असून या प्रकरणाची निवडणूक आयोगाने सुद्धा  चौकशी करावी, अशी मागणी केली. निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात, एनसीडब्ल्यूने म्हटले आहे की, पश्चिम बंगालमध्ये टीएमसी सत्ताधारी पक्ष असल्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांकडून संदेशखळीच्या महिलांना त्यांच्या तक्रारी मागे घेण्यास भाग पाडले जात आहे. 

दरम्यान, टीएमसीने शुक्रवारी (१० मे)  एनसीडब्ल्यूच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. तसेच, टीएमसीच्या म्हणण्यानुसार, अनेक महिलांनी आरोप केला आहे की, भाजपा नेत्यांनी त्यांची फसवणूक करून टीएमसीच्या नेत्यांविरोधात लैंगिक छळाच्या तक्रारी केल्या आहेत.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४West Bengal Lok Sabha Election 2024पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक निकाल २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगNational women commissionराष्ट्रीय महिला आयोगBJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेस