शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

"सुनावणी तात्काळ घ्या...", खासदारकी रद्द करण्याच्या याचिकेवर महुआ मोईत्रांची सर्वोच्च न्यायालयाला विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 18:31 IST

सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, सरन्यायाधीश (CJI) डी वाय चंद्रचूड यांच्यासमोर याचिका होईल. यासाठी ते लिस्टिंगवर निर्णय घेतील.

नवी दिल्ली :  कॅश फॉर क्वेरी प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाला महुआ मोईत्रा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. खासदारकी रद्द केल्याविरोधात याचिका दाखल केली आहे. बुधवारी (13 डिसेंबर) महुआ मोईत्रा यांनी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली. यावर सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, सरन्यायाधीश (CJI) डी वाय चंद्रचूड यांच्यासमोर याचिका होईल. यासाठी ते लिस्टिंगवर निर्णय घेतील.

पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या महुआ मोईत्रा यांच्या याचिकेच्या लिस्टिंगवर भारताचे सरन्यायाधीश (CJI) डी वाय चंद्रचूड निर्णय घेतील. न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठासमोर तातडीच्या लिस्टिंगसाठी महुआ मोइत्रा यांच्या याचिकेचा उल्लेख करण्यात आला. 

न्यायमूर्ती संजय किशन कौल यांनी महुआ मोईत्रा यांचे वकील अभिषेक सिंघवी यांना सांगितले की, "सरन्यायाधीश (CJI) डी वाय चंद्रचूड यावर निर्णय घेतील." दरम्यान, महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी व्यावसायिकांकडून पैसे घेतल्याबद्दल संसदीय नैतिकता समितीने त्यांना दोषी ठरविल्यानंतर लोकसभेने त्यांची गेल्या शुक्रवारी खासदारकी रद्द केली होती. यावेळी नैतिकता समितीने महुआ मोईत्रा यांचे वर्तन अशोभनीय आणि अनैतिक असल्याचा ठपका ठेवला होता. 

काय आहेत आरोप?महुआ मोईत्रा यांनी लोकसभेच्या सदस्य पोर्टलचा युजर आयडी आणि पासवर्ड अनधिकृत व्यक्तीसोबत शेअर करून सभागृहाचा अवमान केला; एवढेच नाहीतर, राष्ट्रीय सुरक्षाही धोक्यात आणली, असा ठपकाही अहवालात ठेवण्यात आला आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी या प्रकरणाची तक्रार केली होती, त्यानंतर नैतिकता समितीने चौकशी सुरू केली होती.

खासदारकी रद्द केल्यानंतर काय म्हणाल्या होत्या महुआ मोईत्रा?आपल्याला हाकलून देण्याचा निर्णय 'कंगारू कोर्टा'द्वारे दिलेल्या फाशीच्या शिक्षेसारखा आहे. विरोधकांना झुकण्यास भाग पाडण्यासाठी सरकारकडून संसदीय समितीचा शस्त्र म्हणून वापर केला जात आहे, आपण अस्तित्वात नसलेल्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल दोषी आढळलो आहोत आणि रोख किंवा भेटवस्तू दिल्याचा कोणताही पुरावा नाही, असे महुआ मोईत्रा खासदारकी रद्द केल्यानंतर म्हणाल्या होत्या. 

टॅग्स :Mahua Moitraमहुआ मोईत्राSupreme Courtसर्वोच्च न्यायालयMember of parliamentखासदारlok sabhaलोकसभा