शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

स्टॅलिन यांच्याकडून राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित, ममतांच्या भुवया उंचावल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 08:10 IST

डीएमकेचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी महाआघाडीकडून राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर महाआघाडीतील इतर पक्षांमध्ये धुसफूस सुरू झाली आहे.

नवी दिल्ली: डीएमकेचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी महाआघाडीकडून राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर महाआघाडीतील इतर पक्षांमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. डीएमकेचे नेते करुणानिधी यांच्या पुतळ्याचे अनावरण चेन्नईतील डीएमकेच्या मुख्यालयात काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळीच एम. के. स्टॅलिन यांनी राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याची घोषणा केली. यावेळी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूही हजर होते.काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजकीय परिपक्वता सिद्ध केली असून, पंतप्रधान मोदींना हरवण्याची त्यांच्यात ताकद असल्याचंही स्टॅलिन म्हणाले आहेत. राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केल्यानंतर कोलकातात असलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याही भुवया उंचावल्या. टीएमसीच्या सूत्रांच्या माहितीनुसार स्टॅलिन यांच्या भूमिकेला पक्षाचं समर्थन नाही.टीएमसीच्या एका नेत्यानं सांगितलं की, पंतप्रधानपदासाठी कोणाचंही नाव सध्या पुढे करणं स्वागतार्ह नाही. पंतप्रधानपदाच्या नावावर निवडणुकांच्या निकालानंतर शिक्कामोर्तब करण्यात येईल, हे आम्ही पहिलंच सांगितलं आहे. स्टॅलिन यांच्या भूमिकेचा परिणाम भाजपाविरोधात एकजूट होत असलेल्या विरोधी पक्षांच्या एकीवर होणार आहे. काँग्रेस स्वतः पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींचं नाव पुढे करत नसल्यानं इतर पक्ष असे कशाला करत आहेत, असा सवालही त्या टीएमसी नेत्यानं उपस्थित केला आहे. तर इतर विरोधी पक्षही स्टॅलिन यांच्या भूमिकेशी असहमत आहेत. सपा, तेलुगू देसम पार्टी, बसपा, तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचा स्टॅलिन यांच्या मागणीला पाठिंबा नाही. लोकसभेच्या निवडणुकीनंतर पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला जाईल, अशी भूमिका विरोधी पक्षांनी घेतली आहे. ममतांनी कमलनाथ यांच्या शपथविधीकडे फिरवली पाठममता बॅनर्जी कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. ममता मध्य प्रदेशला न जाण्याचं कोणतंही कारण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री कार्यालयानं सांगितलेलं नाही. तर टीएमसीकडून खासदार दिनेश त्रिवेदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यावेळी विरोधक जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीMamata Banerjeeममता बॅनर्जी