शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

'मी पंतप्रधान पदासाठी...' I.N.D.I.A. संदर्भात काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 13:55 IST

विरोधकांच्या आघाडीच्या बैठकीत पतप्रधान पदाच्या उमेदवारासह जागावाटपासंदर्भात अनेक मुद्यांव चर्चा झाली. यानंतर तृणमून काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया समोर आली आहे.

INDIA Alliance Meeting Update ( Marathi News )पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याच्या इराद्याने स्थापन झालेल्या विरोधकांच्या I.N.D.I.A. ची मंगळवारी एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पतप्रधान पदाच्या उमेदवारासह जागावाटपासंदर्भात अनेक मुद्यांव चर्चा झाली. यानंतर तृणमून काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया समोर आली आहे.

दिल्लीमध्ये बुधवारी पत्रकारांसोबत बोलताना ममता म्हणाल्या, "मी I.N.D.I.A. आघाडीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून खर्गे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. केजरीवाल यांनी त्याला समर्थन दिले. नीतीश यांच्या नाराजीसंदर्भात माहीत नाही."

I.N.D.I.A. बाठकीत काय घडले? -विरोधी आघाडीच्या या बैठकीत पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून मल्लीकार्जुन खर्गे यांचा प्रस्ताव ठेवताना ममता म्हणाल्या की, ते देशाचे पहिले दलित पंतप्रधान होऊ शकतात. यानंतर आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी या प्रस्तावाचे समर्थन केले. मात्र, याच वेळी मल्लिकार्जुन खर्गे यांनी, सर्वप्रथम निवडणूक जिंकणे महत्वाचे आहे, असे म्हणत याला नकार दिला.

याच बरोबर, जागावाटपासंदर्भात माध्यमांसोबत बोलताना आरजेडी खासदार मनोज झा म्हणाले, “यासंदर्भात स्पष्ट चर्चा झाली. जागावाट आणि जनसंपर्क कार्यक्रम पुढील 20 दिवसांच्या आत सुरू होईल आणि लवकरात लवकर निर्णयही होईल.” याशिवाय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आघाडीत सहभागी असलेल्या पक्षांनी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जागावाटपाला अंतिम रूप देण्याचा नर्णय घेतला आहे. 

बैठकीत या नेत्यांनी घेतला होता सहभाग- विरोधकाांची ही बैठक दिल्लीतील हॉटेल अशोकमध्ये पार पडली. या बैठकीला काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि केसी वेणुगोपाल, जेडीयूकडून नीतीश कुमार आणि राजीव रंजन सिंह, टीएमसीकडून ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी, आरजेडीकडून लालू प्रसाद आणि तेजस्वी यादव, एनसीपीकडून शरद पवार, शिवसेना (यूबीटी)कडून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या बैठकीला उपस्थित होते.

याशिवाय, समाजवादी पक्षाकडून अखिलेश यादव आणि रामगोपाल यादव, डीएमकेकडून एमके स्टॅलिन आणि टीआर बालू, नॅशनल कॉन्फ्रन्सकडून फारूक अब्दुल्ला, पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी (PDP) कडून महेबूबा मुफ्ती, राष्ट्रीय लोक दलाकडून जयंत चौधरी, अपना दल (के) कडून कृष्णा पटेल आणि पल्लवी पटेल आदी नेते या बैठकीत सहभागी झाले होते.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे