TMC-BJP faceoff intensifies in West Bengal; BJP workers holding march in Kolkata lathi-charged | पश्चिम बंगालमध्ये राडा, ममता बॅनर्जींच्याविरोधात भाजपा कार्यकर्ते आक्रमक
पश्चिम बंगालमध्ये राडा, ममता बॅनर्जींच्याविरोधात भाजपा कार्यकर्ते आक्रमक

कोलकाताः लोकसभा निवडणूक निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार थांबण्याची चिन्हे दिसत नाही. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपा यांच्यातील वाद विकोपाला पेटला आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत तिघांचा मृत्यू झाला आहे. यावरुन तृणमूल काँग्रेस तसेच भाजपा यांनी एकमेकांवर आरोप करत आहेत.

दरम्यान, आज तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनादरम्यान जय श्री राम अशा घोषणा दिल्या. तसेच, यावेळी आक्रमक झालेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे येथील तणाव वाढला आहे.  


तृणमूल-भाजपा यांच्यातील संघर्ष चिघळला, तीन दिवसांत चार हत्या
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस व भाजपामध्ये सुरू असलेला हिंसक संघर्ष निवळण्याची लक्षणे नसून उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील कांकिनारा येथे सोमवारी रात्री गावठी बॉम्बच्या हल्ल्यात दोन जण ठार व तीन जण जखमी झाले. ते दोघे आमचे कार्यकर्ते असून, त्यांना भाजपाच्या गुंडांनी ठार मारल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही दिवसांत हिंसाचारामध्ये ठार झालेल्या दहा जणांच्या वारसदारांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची भरपाई देण्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले आहे.


बंगालचा गुजरात करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु : ममता बॅनर्जी
पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून राष्ट्रपती शासन लागू करण्याची तयारी केंद्रात सुरु असल्याची चर्चा सुरु आहे. त्यातच आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला असून,  बंगालचा गुजरात करण्यासाठी  भाजपकडून प्रयत्न होत असल्याचे आरोप ममतांनी केले आहे. राज्यपाल केसरी नाथ त्रिपाठी यांनी गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेल्या भेटीवर त्या आपली प्रतिकिया देतांना बोलत होत्या.
 


Web Title: TMC-BJP faceoff intensifies in West Bengal; BJP workers holding march in Kolkata lathi-charged
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.