शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Abhishek Banerjee : “ना चेहरा, ना आधार आणि ना व्हिजन...”; अभिषेक बॅनर्जींचं बजेटवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 17:22 IST

Abhishek Banerjee : बजेट सादर झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसचे (TMC) खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत बंगालसाठी कोणतीही ठोस घोषणा केली नसल्याचं म्हटलं आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत आर्थिक वर्ष २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर केला. यावर्षी अनेक राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, ज्यावर या बजेटचा थेट परिणाम होणार आहे. भाजपासाठी पश्चिम बंगालची सत्ता हे सर्वात मोठं आव्हान आहे. बजेट सादर झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसचे (TMC) खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत बंगालसाठी कोणतीही ठोस घोषणा केली नसल्याचं म्हटलं आहे.

टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी म्हणाले, "तुम्ही सर्वजण सभागृहात उपस्थित होतात आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांनी १ तास २५ मिनिटं भाषण केलं. या संपूर्ण वेळात पश्चिम बंगालचा उल्लेखही झाला नाही. या बजेटमध्ये तरुण, शेतकरी किंवा रोजगाराचाही कोणताही उल्लेख नाही. जे सरकार आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), स्किल इंडिया आणि प्रगत तंत्रज्ञानावर बोलत आहे, ते रोजगारावर मात्र बोलत नाही."

"जुनं सामान नव्या डब्यात...”; बजेटवरुन रोहिणी आचार्य यांचा सरकारवर जोरदार निशाणा

“अर्थसंकल्प चेहरा नसलेला, आधार नसलेला, व्हिजन नसलेला”

बॅनर्जी अभिषेक बॅनर्जी पुढे म्हणाले की, "केंद्र सरकारने अर्थसंकल्पात हे देखील स्पष्ट केलं नाही की तरुणांना रोजगार कसा मिळेल किंवा कोणत्या दिशेने रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी किंवा उत्पन्न स्थिर करण्याच्या पद्धतींवर काहीही बोललं गेलं नाही. कोणत्याही समाजासाठी कोणताही उपाय सांगितलेला नाही. हा अर्थसंकल्प चेहरा नसलेला, आधार नसलेला आणि व्हिजन नसलेला आहे."

बजेटमध्ये महिलांसाठी ५ मोठ्या घोषणा; नारीशक्तीसोबतच भारतीय अर्थव्यवस्थेला मिळणार 'पॉवर डोस'

 फक्त साडी नव्हे, भारताचा सांस्कृतिक वारसा! निर्मला सीतारामन यांच्या 'बजेट डे' साडीचं काय खास वैशिष्ट्य?

नव्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरची घोषणा 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पश्चिम बंगालमधील दानकुनीपासून पश्चिमेकडील सूरतपर्यंत नवीन डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरची घोषणा केली आहे. याशिवाय, देशातील सात शहरांना हाय-स्पीड रेल कॉरिडॉरने जोडण्याची घोषणाही करण्यात आली आहे, ज्यामध्ये बंगालमधील सिलीगुडीचाही समावेश आहे. या ७ शहरांच्या हाय-स्पीड कॉरिडॉरमध्ये वाराणसी-सिलीगुडी, मुंबई-पुणे, चेन्नई-बंगळुरू, हैदराबाद-बंगळुरू, पुणे-हैदराबाद आणि दिल्ली-वाराणसी यांचा समावेश आहे. चेन्नई ही तामिळनाडूची राजधानी असून तिथेही निवडणुका होणार आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Abhishek Banerjee slams budget: 'No face, no base, no vision'.

Web Summary : TMC MP Abhishek Banerjee criticized the Union Budget 2026 for neglecting West Bengal. He stated the budget lacked vision, offered nothing for youth, farmers, or employment, and failed to address economic security.
टॅग्स :Budgetअर्थसंकल्प २०२६Trinamool Congressतृणमूल काँग्रेसPoliticsराजकारण