सेहवागने शेअर केला शेतक-याचा फोटो अन् चर्चेला उधाण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 17:36 IST2018-05-30T17:34:04+5:302018-05-30T17:36:22+5:30

भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग ट्विटरवर नेहमीच चर्चेत असतो. ब-याच वेळा विरेंद्र सेहवागने केलेले ट्विट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला जातो. मंगळवारी विरेंद्र सेहवागने एक ट्विट केले, त्या ट्विटची चर्चा नेटिझन्समध्ये सुरु आहे.

Tiwit tweeted the photo of the farmer and photo! | सेहवागने शेअर केला शेतक-याचा फोटो अन् चर्चेला उधाण !

सेहवागने शेअर केला शेतक-याचा फोटो अन् चर्चेला उधाण !

नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग ट्विटरवर नेहमीच चर्चेत असतो. ब-याच वेळा विरेंद्र सेहवागने केलेले ट्विट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला जातो. मंगळवारी विरेंद्र सेहवागने एक ट्विट केले, त्या ट्विटची चर्चा नेटिझन्समध्ये सुरु आहे.
एक शेतकरी खो-यावर (फावडा) भाकरी गरम करत आहे, असा फोटो विरेंद्र सेहवाने आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केला आणि त्याखाली लिहिले की, " भाकरी ज्या साहित्यावर गरम करत आहे, त्याच्यापासून त्याने ती(भाकरी) मिळविली आहे. सुंदर !"




विरेंद्र सेहवागच्या या ट्विटवर नेटिझन्सच्या वेगवेगऴ्या प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत. असा शेतक-याचा फोटो ट्विट केल्यामुळे अनेक जण विरेंद्र सेहवागची स्तुती करत आहेत, तर अनेक जणांकडून हा फोटो सुंदर असण्यापेक्षा भावनात्मक असल्याचे सांगण्यात येत आहे.  

Web Title: Tiwit tweeted the photo of the farmer and photo!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.