शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

प्रादेशिक चित्रपट पाहून थक्कच झालो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 02:32 IST

प्रादेशिक चित्रपट आतापर्यंत फारसे पाहिले नव्हते. मात्र परीक्षक म्हणून जवळपास सर्व भाषांतील चित्रपट पाहता आले. ते पाहून आपण थक्कच झालो.

नवी दिल्ली : प्रादेशिक चित्रपट आतापर्यंत फारसे पाहिले नव्हते. मात्र परीक्षक म्हणून जवळपास सर्व भाषांतील चित्रपट पाहता आले. ते पाहून आपण थक्कच झालो. सर्वच बाबतींत भाषिक चित्रपट अतिशय उत्तम दर्जाचे आहेत, हे लक्षात आले, असे प्रतिपादन परीक्षक मंडळाचे प्रमुख शेखर कपूर यांनी केले.चित्रपट पुरस्कार जाहीर झाल्यानंतर शेखर कपूर यांनी प्रादेशिक चित्रपटांचे तोंडभरून कौतुक केले. यंदाच्या पुरस्कारांबाबत सर्व स्तरांतून समाधान व्यक्त करण्यात आले. उत्कृष्ट मनोरंजनपर चित्रपटाचा पुरस्कार ‘बाहुबली-२’ला मिळण्यात काहीच गैर नाही, अशी प्रतिक्रिया दिग्गजांनी व्यक्त केली. ‘कच्चा लिंबू’ला मिळालेल्या पुरस्कारामुळे आमच्या टीमने जी मेहनत केली, त्याचे चीज झाले, असे प्रसाद ओकने बोलून दाखवले, तर नर्गिस दत्त पुरस्कार मिळाल्याबद्दल ‘धप्पा’ चित्रपटाच्या निपुण धर्माधिकारीने आनंद गगनात मावेना, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. लहान मुलांच्या भावविश्वावरील हे दोन्ही चित्रपट आहेत. नागराज मंजुळे यांनीही आनंद व्यक्त केला.>दुसरा मरणोत्तर पुरस्कारदादासाहेब फाळके पुरस्कारासाठी निवड झालेले विनोद खन्ना यांनी १९७0पासून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ते ४९व्या फाळके पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. याआधी पृथ्वीराज कपूर यांनाही हा पुरस्कार मरणोत्तर मिळाला होता.>बॉलिवूडमधील पुरस्कारसर्वोत्कृष्ट अभिनेत्री :श्रीदेवी (मॉम)सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री : दिव्या दत्ता (इरादा)सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट : न्यूटन (निर्माता : अमित मसुरकर)सर्वोत्कृष्ट साहसी दृश्ये : अब्बास अली मोगल (बाहुबली २)सर्वोत्कृष्ट स्पेशलइफेक्ट्स : बाहुबली २सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन : गणेश आचार्य (गोरी तू लठ मार आणि टॉयलेट एक प्रेम कथा)स्पेशल मेन्शन (फीचर फिल्म) : अभिनेता पंकज त्रिपाठी (न्यूटन)सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत : ए.आर. रहमान (मॉम)बंगाली चित्रपट : मयुरक्षीकन्नड चित्रपट :हेब्बत रामाक्कामल्याळम : तोंडीमुतलम दृकसाक्ष्यमतेलुगू चित्रपट : गाझीतामिळ : टू लेटलडाखी : वॉकिंग विद द विंडओरिया :हॅलो आर्सीगुजराती : जीएचएचआसामी चित्रपट : इशूसर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट न्यूटनबोनी कपूर झाले भावनाविवश : श्रीदेवी यांची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून निवड झाल्याबद्दल बोनी कपूर यांनी आनंद व्यक्त केला आहे. पुरस्काराची बातमी कळताच ते भावनाविवश झाले. ते म्हणाले, माझी पत्नी म्हणून तिला पुरस्कार मिळाल्याचा मला आनंद आहेच; पण त्या पुरस्कारासाठी तिची निवडच योग्य होती, असे मला वाटते.