Tipu Sultan Masjid: टिपू सुलतानने बांधलेल्या मशिदीमुळे नवा वाद, पूर्वी हनुमान मंदिर असल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 13:15 IST2022-05-17T13:15:26+5:302022-05-17T13:15:50+5:30
Tipu Sultan Masjid: ज्ञानवापीनंतर आता कर्नाटकातील टिपू सुलतानने बांधलेल्या जामा मशिदीचा वाद समोर आला आहे. हनुमान मंदिर तोडून मशीद बांधल्याचा काही हिंगू संघटनांचा दावा आहे.

Tipu Sultan Masjid: टिपू सुलतानने बांधलेल्या मशिदीमुळे नवा वाद, पूर्वी हनुमान मंदिर असल्याचा दावा
Tipu Sultan Masjid: उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीचा (Gyanvapi Controversy) वाद अद्याप शमला नाही, तोच कर्नाटकातही असाच वाद निर्माण झाला आहे. हा वाद कर्नाटकात टिपू सुलतानच्या काळात बांधलेल्या मशिदीचा आहे. या मशिदीच्या ठिकाणी पूर्वी हनुमान मंदिर होते, असा दावा करण्यात आला आहे. या दाव्यामुळे आता कर्नाटकच्या राजकारणात खळबळ माजली आहे.
हिंदू संघटनेचा दावा
कर्नाटकातील श्रीरंगपटना नावाच्या ठिकाणी एक मोठी जामा मशीद आहे. असे म्हणतात की, टिपू सुलतानने त्यांच्या काळात ही मशीद बांधली होती. पण आता काही हिंदू संघटनांनी दावा केला आहे की, तिथे पूर्वी हनुमानाचे मंदिर असायचे. टिपू सुलतानाने मंदिर तोडून त्या जागी मशीद बांधली. यावरून हा नवीन वाद सुरू झाला आहे.
मशिदीत पुजा करण्याची मागणी
आता हिंदू संघटनांनी त्या मशिदीत पूजा करण्याची मागणी केली आहे. तेथे हनुमानाचे मंदिर होते असे उपलब्ध कागदपत्रांवरून सिद्ध होत असल्याचा दावा हिंदू संघटनेने केला आहे. असा दावाही केला जात आहे की मशिदीच्या भिंतींवर हिंदू शिलालेख सापडले आहेत, जे तेथे मंदिर होते हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहे.
मशिदीला सुरक्षा वाढवण्याची मागणी
श्रीरंगपटना येथील जामा मशिदीत मंदिर असल्याच्या दाव्यानंतर मशिदीच्या बाजूने सुरक्षा वाढवण्याची मागणी होत आहे. मात्र, या प्रकरणी अद्यापपर्यंत कर्नाटक सरकार किंवा अन्य कोणत्याही मोठ्या संस्थेकडून प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.