शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 09:18 IST

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते खरगे म्हणाले की, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी जातनिहाय जनगणनेची मागणी केली होती. या मागणीसाठी देशभर आंदोलने केली होती.

बेंगळुरू : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पुढील जनगणनेत पुरेसा निधी वाटप करावा आणि जातनिहाय गणनेसाठी वेळ मर्यादा निश्चित करावी अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी केली.

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते खरगे म्हणाले की, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी जातनिहाय जनगणनेची मागणी केली होती. या मागणीसाठी देशभर आंदोलने केली होती. आम्हाला जे साध्य करायचे होते, ते पूर्ण झाल्याबद्दल आनंद वाटतो. दोन वर्षांपूर्वी मी केंद्र सरकारला जातीय जनगणनेबाबत पत्र लिहिले होते, तेव्हा सरकार सहमत नव्हते. आता  घेतलेला निर्णय ही चांगली गोष्ट आहे.

नक्षलींचा 'डोंगर' सुरक्षा दलांच्या ताब्यात; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाई

सरकरने कालमर्यादा ठरवावी. जर कालमर्यादा नसेल तर त्याला बराच वेळ लागेल. म्हणून माझी सूचना अशी आहे की सरकारने याकडे विशेष लक्ष द्यावे. दोन-तीन महिन्यांत किंवा सरकारने ठरवलेल्या कोणत्याही वेळेच्या आत, शक्य तितक्या लवकर सर्वेक्षण करावे आणि लोकांना दिलेले वचन पूर्ण करावे.

- मल्लिकार्जुन खरगे , काँग्रेस अध्यक्ष

राहुल गांधींचा पुढाकार

आगामी बिहार निवडणुका लक्षात घेऊन जातीय जनगणनेचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे,  असे मला वाटत नाही असे एका प्रश्नाच्या उत्तरात खरगे यांनी सांगितले. ते म्हणाले की, ‘मला राजकारण करायचे नाही. जे चांगले आहे, त्याचे मी स्वागत करतो, जे वाईट आहे त्याचा मी विरोध करतो, कारण शेवटी देश महत्त्वाचा, लोक महत्त्वाचे आहेत. लोकांना जातीय जनगणना हवी होती, म्हणून आम्ही त्याची मागणी करण्यासाठी आंदोलने केली. सर्व विरोधी पक्षांनी देशभर त्यासाठी दबाव आणला. राहुल गांधींनी जातीय जनगणनेची मागणी करण्यात पुढाकार घेतला.

कर्नाटकसह काही राज्यांच्या सर्वेक्षणांवर टीका केली जात आहे, यावर खरगे म्हणाले,  की आता केंद्र सरकार सर्व्हे करीत आहे, यावर ते टीका करतात का ते पाहूया. जातींची गणना करण्याच्या निर्णयाचे स्वागत करतो. मात्र, ती दिखाऊगिरी नसावी आणि आर्थिक, शैक्षणिक सर्वेक्षण परिपूर्ण पद्धतीने केले पाहिजे."

निधी वितरण करा

केंद्र सरकारने बुधवारी आगामी जनगणनेत "पारदर्शक" पद्धतीने जातीय गणना समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने केलेल्या या घोषणेची पूर्तता करण्याचे आवाहन करताना, खर्गे म्हणाले की, आजपर्यंत सरकारने त्यासाठी पुरेशा निधीचे वाटप केलेले नाहीत आणि निधीशिवाय सर्वेक्षण कसे करता येईल?

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेस