शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत तिसरा मित्र नको म्हणणाऱ्यांना भाजपमध्ये बळ; आकडेवारीने वाढवली अजित पवारांची डोकेदुखी!
2
...तर मी ओबीसींच्या आंदोलनात पुन्हा उतरेन; मंत्री छगन भुजबळांचा सरकारला इशारा
3
न्यूझीलंडने शेवट विजयाने केला; PNG च्या ७८ धावांचा पाठलाग करताना संघर्ष करावा लागला
4
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
5
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
6
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
7
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

यंदा उष्णतेची लाट

By admin | Published: March 04, 2017 4:28 AM

येत्या दोन महिन्यांमध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणच्या लोकांनी उष्णतेच्या लाटेला तोंड द्यायची तयारी ठेवावी.

हैदराबाद : येत्या दोन महिन्यांमध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणच्या लोकांनी उष्णतेच्या लाटेला तोंड द्यायची तयारी ठेवावी. सामान्य तापमानापेक्षा जास्त तापमान यंदाच्या उन्हाळ््यात असेल, असे भाकीत हवामान खात्याने वर्तवले आहे. या दोन्ही राज्यांत आतापासूनच कडक उन्हाळा जाणवू लागला असून, त्यामुळे लोक हैराण झाले आहेत. पुढील दोन महिने उष्णतेची लाट असेल, असे हवामान खात्याने सांगितल्यामुळे तेथील लोकांना पाण्याचीही टंचाई भासेल, असे दिसत आहे.हा उन्हाळा गेल्या वर्षीच्या उन्हाळ््यासारखाच असेल. मागच्या वर्षीही तापमान सामान्यापेक्षा जास्त नोंदले गेले. त्यामुळे यंदाही गेल्यावर्षीसारखीच परिस्थिती असेल, असे येथील आयएमडीच्या हवामानशास्त्र केंद्राचे संचालक वाय. के. रेड्डी यांनी सांगितले. पुढील दोन महिन्यांत उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती असू शकेल, असेही रेड्डी म्हणाले.तापमान एप्रिल आणि मे महिन्यात ४७ अंश सेल्सिअस एवढे असू शकेल व पारा या दोन महिन्यांत अनेक दिवस ४५ अंश सेल्सियसच्या जवळपास असेल, असे ते म्हणाले. येत्या उन्हाळ््यातील उष्णतेच्या लाटेला तोंड देण्यासाठी आमची तयारी आहे, असे राष्ट्रीय आपत्ती निवारण व्यवस्थापन प्राधिकरणने (एनडीएमए) गेल्या आठवड्यात म्हटले होते. राज्यांना कृती योजना पाठवण्यात आल्यामुळे २०१५ च्या तुलनेत २०१६ मध्ये उष्णतेच्या लाटेत मरण पावणाऱ्यांची संख्या खाली आणता, असे प्राधिकरणचे सहसचिव थिरुप्पुगझ यांनी सांगितले. ते म्हणाले की, १९९२ ते २०१५ या कालावधीत देशात उष्णतेच्या लाटेशी संबंधित घटनांमध्ये अंदाजे २२ हजार लोक मरण पावले होते. या वेळी लोकांनी सावधानता बाळगावी. (वृत्तसंस्था)>अनेक भागांमध्ये भीषण पाणीटंचाई फेब्रुवारी महिना आताच संपला असून, पावसाळा सुरू व्हायला आणखी किमान तीन महिने शिल्लक आहेत. मात्र, ओडिशाच्या अनेक भागांमध्ये भीषण पाणीटंचाई आताच भासू लागली आहे. तलाव आताच कोरडे पडू लागले आहेत आणि नद्यांची पातळीही खाली आली आहे. त्यामुळे जूनअखेरपर्यंत ओडिशाला याहून अधिक पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेल, असे सांगण्यात येत आहे. अनेक भागांत आताच दोन वा तीन दिवसांनी पाणी मिळत आहे. तेही पुरेसे नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.२०१५ मध्ये उष्णतेच्या लाटेत २,४०० लोक मरण पावले होते, तर २०१६ मध्ये १,१०० लोक मरण पावले होते.