शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

सरकार बदलण्याची वेळ आली आहे, शरद पवार यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 5:02 AM

देशभर पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले आहेत. मात्र, पंतप्रधान नेहमीप्रमाणे गप्प बसले आहेत.

- सुरेश भटेवरा नवी दिल्ली : देशभर पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले आहेत. मात्र, पंतप्रधान नेहमीप्रमाणे गप्प बसले आहेत. ते कोणत्या जगात राहतात, हेच समजत नाही. देशभर जनतेच्या मनात आज संतापाच्या ज्वाला उसळल्या असताना पंतप्रधान मोदी एक शब्दही बोलायला तयार नाहीत. सारे विरोधक आज त्याची जाणीव करून देण्यासाठीच रस्त्यावर उतरले आहेत, अशा आक्रमक स्वरात सरकारला ललकारीत राहुल गांधींनी रामलीला मैदानावर २१ विरोधी पक्षांचा भारत बंद यशस्वी झाल्याची ग्वाही दिली.विरोधकांच्या संयुक्त बंदच्या निमित्ताने आयोजित धरणे कार्यक्रमात सोनिया गांधी काही काळ अवश्य सहभागी झाल्या. मात्र, त्यांनी भाषण केले नाही. त्या मंचावर आल्या तेव्हा सर्वांनाच असे वाटले की विरोधकांच्या संयुक्त आघाडीचे नेतृत्व त्याच करणार आहेत. मात्र, थोड्याच वेळात त्यांनी हा मंच सोडला व आपल्या निवासस्थानी निघून गेल्या. यानंतर रामलीला मैदानावर विरोधी पक्षांचे नेते जसजसे एकजूट होऊ लागले तेव्हा भारत बंद कार्यक्रमात विरोधकांचे नेतृत्व राहुल गांधीच करणार आहेत, हे स्पष्ट झाले. व्यासपीठावर बोलणाऱ्या वक्त्यांचा क्रमही त्याच पद्धतीने ठरला. सर्वात शेवटी राहुल गांधींच्या आधी आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवारांचे भाषण झाले. मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवीत पवार म्हणाले, ‘सामान्य माणासाला दिलासा देण्यासाठी जी पावले सरकारने वेळीच उचलायला हवी होती ती उचलली नाहीत. साहजिकच देशभर जनतेच्या मनात रोष उत्पन्न झाला आहे. सत्तर वर्षांत काहीच झाले नाही ती बहाद्दुरी अवघ्या ४ वर्षांत आमच्या सरकारने करून दाखवली आहे, असा मोदी सरकारचा दावा आहे. प्रत्यक्षात इंधनाच्या भाववाढीबरोबर गॅसचे दरही वाढले. डॉलरच्या तुलनेत विक्रमी स्तरावर रुपयाची घसरण झाली, ही सरकारची बहाद्दुरी आहे. हे सरकार जनविरोधी आहे, हे लोकांना पटवून देण्याची जबाबदारी सर्व विरोधी पक्षांवर आहे. केंद्रातले सत्तांतर त्यामुळेच घडेल’, पोलिसांनी येचुरी यांना तासभरासाठी पोलीस ठाण्यात बसवून ठेवले.>सरकारने मर्यादा ओलांडल्या - मनमोहन सिंगनरेंद्र मोदी सरकारने घेतलेले अनेक निर्णय देशहिताचे नाहीत. या सरकारने आता सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, असे उद्गार माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी सोमवारी जाहीर सभेत काढले. देशाचे सार्वभौमत्व व लोकशाही यांना वाचविण्यासाठी विरोधी पक्षांनी आपापसातले मतभेद विसरून भाजपा व नरेंद्र मोदी सरकारविरोधात एकजुटीने लढा उभारावा, असे आवाहनही त्यांनी केले.ते पुढे म्हणाले की, नोटाबंदी करण्यामागे नेमके काय कारण होते, याचा अद्याप कुणालाही पत्ता लागलेला नाही. त्यानंतर लघु उद्योगांचे कंबरडेच मोडले आहे. आश्वासनांची पूर्तता करण्यात सपशेल अयशस्वी ठरलेल्या मोदी सरकारच्या कामगिरीवर देशातील युवक, शेतकरी, सामान्य माणसे असे सारेच घटक नाराज आहेत.जनतेच्या मनातील ही भावना ओळखून विरोधी पक्षांनी देश व लोकशाही वाचविण्यासाठी आता संघर्ष केला पाहिजे. या सभेला यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी उपस्थित होत्या; पण त्यांनी भाषण केले नाही.>भाजप, मोदी विद्वेष पसरवत आहेत - राहुल गांधीराजघाटावरून सोमवारी सकाळी राहुल गांधी व अन्य नेते रामलीला मैदानात गेले. तिथे जाहीर सभेत भाषण करताना राहुल गांधी म्हणाले की, जे काम सत्तर वर्षांत झाले नाही ते काम मोदी सरकारने चार वर्षांत करून दाखविले आहे ते म्हणजे देशभरात विद्वेष पसरविण्याचे. समाजातील सर्व घटकांत फूट पाडण्याचे उद्योग भाजपने केले आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरू आहे. स्वयंपाकाच्या गॅसची किंमत दर सिलिंडरमागे ८०० रुपये झाली आहे.>गांधीजींना आदरांजली वाहून बंदची सुरुवातकैलास मानसरोवर यात्रेहून दिल्लीत परतल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी सकाळी राजघाट येथे जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. त्यावेळी १६ राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते.भारत बंददरम्यान सोमवारी नवी दिल्लीत धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आदी नेते उपस्थित होते. पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दराविरुद्ध काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनी भारत बंदचे आवाहन केले होते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार