शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

काळाचा घाला! लग्नाची वरात सासरी पोहोचण्यापूर्वीच नववधूचा मृत्यू, नवरदेवाची मृत्यूशी झुंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 16:27 IST

Accident : ज्या मुलीला सून म्हणून घरी आणणार होते, तिच्यावरच अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ या कुटुंबावर आली आहे.

लग्नाची वरात घेऊन घरी निघालेल्या गाडीचा अपघात झाल्याने नववधूचे दुर्दैवी निधन झाले आहे, तर नवरदेव गंभीर जखमी झाला आहे. ही दुःखद घटना बिहारच्या भोजपूरमध्ये घडली आहे. लग्नानंतर नवरा-नवरी घरी परतत असताना हा अपघात घडला आहे. या अपघातात नवरीचा जागीच मृत्यू झाला असून, नवरा मृत्यूशी झुंज देत आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने कारला धडक दिल्याने हा अपघात घडला. 

नुकतंच लग्न आणि इतर सोहळे आटोपून नववधू आणि वरासह कुटुंब आपल्या घरी परतत होते. नवरा-नवरीसोबतच या गाडीत आणखी ७ लोक देखील होते. घरी परतत असताना त्यांच्या गाडीला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात गाडीतील सगळेच गंभीर जखमी झाले. सगळ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारांदरम्यान नववधूची प्रकृती गंभीर झाली आणि तिचा मृत्यू झाला. तर, नवऱ्याची प्रकृती अद्याप गंभीर आहे. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घरात वरात येण्याऐवजी अंत्ययात्र निघल्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.

धुमधडाक्यात पार पडले लग्न!

बिहारमधील भोजपुर येथील सिकरहटामधील रंजमलदिह या गावात ही घटना घडली आहे. या गावात राहणारे ओम प्रकाश सिंह यांचा मुलगा मोनू कुमार याचे लग्न हसन बाजारमधील इनरपतपूर गावातील दूधनाथ सिंह यांची मुलगी ललिता हिच्याशी ठरले होते. २८ मे रोजी दोघांचे लग्न धुमधडाक्यात पार पडले. लग्नसोहळा उरकून हे कुटुंब आपल्या गावी परतत होते, तेव्हा वाटेतच हा मोठा अपघात झाला.  

कुटुंबावर शोककळा

नवरा-नवरीची गाडी सिकरौलजवळ पोहोचताच समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. ही टक्कर इतकी भयानक होती की, गाडीतील सातही लोक जखमी झाले. तर, उपचारादरम्यान नवरीने अखेरचा श्वास घेतला. ज्या मुलीला सून म्हणून घरी आणणार होते,तिच्यावरच अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ या कुटुंबावर आली आहे.

टॅग्स :AccidentअपघातBiharबिहारDeathमृत्यू