शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

तुरुंगातील एकता; तिहारमधील 150 हिंदू कैद्यांचा मुस्लिमांसोबत रोजा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 12:13 IST

यंदा रोजा ठेवणाऱ्या हिंदूंच्या संख्येत तिप्पट वाढ

नवी दिल्ली: तिहारच्या तुरुंगातील 150 हिंदू कैद्यांनी यंदा रोजा ठेवला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रोजा पाळणाऱ्या हिंदू कैद्यांचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या वर्षी 59 हिंदू कैद्यांनी रोजा ठेवला होता. तुरुंगातील मुस्लिम कैद्यांसोबतचा बंधूभाव वाढावा, एकता कायम राहावी, यासाठी बरेचसे हिंदू कैदी रोजा ठेवत असल्याची माहिती तुरुंगातील अधिकाऱ्यांनी दिली. 'तिहार तुरुंगात एकूण 16 हजार 665 कैदी आहेत. यातल्या 2 हजार 658 कैद्यांनी रोजा पाळला आहे. यात हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मांच्या कैद्यांचा समावेश आहे. आम्ही त्यांच्यासाठी विशेष आयोजन केलं आहे. यंदा रोजा ठेवणाऱ्या मुस्लिमांचं प्रमाण वाढलं आहे. ही वाढ जवळपास तिप्पट आहे,' अशी माहिती तुरुंग प्रशासनाच्या प्रवक्त्यांनी दिली. 'मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तिहारमधल्या विविध तुरुंगात असलेल्या हिंदू कैद्यांनी त्यांच्या अधीक्षकांची भेट घेतली. त्यांना रोजा ठेवायचा असल्याची माहिती त्यांनी अधीक्षकांना दिली. यानंतर अधीक्षकांनी रोजा ठेवणाऱ्या एकूण कैद्यांची मोजणी केली. यानंतर त्यांच्यासाठी विशेष आयोजन करण्यात आलं,' असं प्रवक्त्यांनी सांगितलं. हिंदू कैद्यांनी रोजा ठेवण्यामागे विविध कारणं असल्याचं तुरुंग अधिकाऱ्यांनी म्हटलं. 'मुस्लिम कैद्यांसोबतचा बंधूभाव वाढावा, यासाठी रोजा ठेवत असल्याचं काही कैद्यांनी सांगितलं. तुरुंगात आल्यावर धर्म बदलल्याची कबुली द्यायची नसल्यास काही जण हे कारण देतात. तुरुंगात आल्यावर 80 ते 90 टक्के जण धार्मिक होतात, असं आम्हाला आढळून आलं आहे. धार्मिक कार्यातून शांतता मिळते यासाठीही काही जण रोजा ठेवतात. तर देवाची प्रार्थना केल्यास तुरुंगातून लवकर सुटका होईल, अशी अनेकांची समजूत असते,' असं तुरुंग प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितलं. नवरात्रौत्सव काळात तुरुंगातले अनेक मुस्लिम कैदी उपवास करतात, अशी माहिती दुसऱ्या एका अधिकाऱ्यानं दिली. तुरुंगातले अनेक मुस्लिम कैदी हिंदू कैद्यांसोबत उपवास करतात. तिहारच नव्हे, तर देशातल्या अनेक तुरुंगांमध्ये अशा प्रकारचं वातावरण पाहायला मिळतं, असं त्यांनी सांगितलं. रमजानच्या काळात धर्मगुरुंना तुरुंगात येण्याची परवानगी दिली जाते. कैदी त्यांच्यासोबत प्रार्थना करतात. यानंतर कैद्यांना रुअफजा आणि खजूर दिले जातात.  

टॅग्स :RamzanरमजानHinduहिंदूMuslimमुस्लीमPrisonतुरुंग