Viral Video: वाघानं केला बाइकस्वाराचा पाठलाग, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 20:19 IST2019-07-01T19:13:56+5:302019-07-01T20:19:55+5:30

एखादा वाघ जेव्हा बाइकस्वारांच्या मागे लागतो तेव्हा काय अवस्था होते, याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

tiger chases forest officials riding on a bike video goes viral | Viral Video: वाघानं केला बाइकस्वाराचा पाठलाग, अन्...

Viral Video: वाघानं केला बाइकस्वाराचा पाठलाग, अन्...

नवी दिल्लीः बऱ्याचदा कुत्रे बाइकस्वारांच्या मागे धावत असल्याचं आपण पाहिलंच असेल. पण एखादा वाघ जेव्हा बाइकस्वारांच्या मागे लागतो तेव्हा काय अवस्था होते, याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. फॉरेस्‍ट वाइल्‍डलाइफ प्रोटेक्‍शन सोसायटी (Forests and Wildlife Protection Society)ने हा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केला आहे. पाहता पाहताच हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. केरळमधल्या वायनाडमधल्या मुथंगा वाइल्डलाइफ सेंक्च्युरीमध्ये दोन जण मोटारसायकलवर स्वार आहेत. तेव्हा त्यांची नजर एका वाघावर जाते, तो वाघ त्यांच्या मागे धावत असतो.

या व्हिडीओमध्ये काही सेकंदांपर्यंत या वाघानं त्या बाइकस्वारांचा पाठलाग केल्याचं पाहायला मिळतंय. मिळालेल्या माहितीनुसार, मोटारसायकलवर स्वार असलेले व्यक्ती हे वनविभागाचे अधिकारी होते. ते पाहणीसाठी बाहेर पडले होते.या व्हिडीओवर काहींनी चिंता व्यक्त केली आहे. तर काहींनी यावर विनोद केले आहेत. त्यामुळे जंगल क्षेत्रातून प्रवास करताना नियमांचं पालन अवश्य करावं, जेणेकरून अशा घटना टाळता येतील.



 

Web Title: tiger chases forest officials riding on a bike video goes viral