Ticket sold for 6 crores; The boy of the candidate is very angry with Kejriwal | ६ कोटींना विकलं तिकीट; उमेदवाराच्या मुलाचाच केजरीवालांवर वार
६ कोटींना विकलं तिकीट; उमेदवाराच्या मुलाचाच केजरीवालांवर वार

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात उद्या दिल्लीत मतदान होणार आहे. त्यापूर्वीच दिल्लीच्या राजकरणात एका खळबळजनक खुलासा समोर आला आहे. आम आदमी पक्षाचे तिकीट देण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ६ कोटी रुपये घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे केजरीवाल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

आम आदमी पक्षाचे पश्चिम दिल्लीतील उमेदवार बलबीर सिंह जाखड यांचा मुलगा उदय जाखड याने, तिकीटासाठी अरविंद केजरीवाल यांना ६ कोटी रुपये घेतल्याचा धक्कादायक आरोप केला आहे.विशेष म्हणजे पैसे दिल्याचा आपल्याकडे ठोस पुरावा असल्याचा दावाही त्याने केला आहे. तीन महिन्यापूर्वीच पक्षात आलेल्या आपल्या वडिलांना तिकीटासाठी पैसे द्यावे लागले असे, उदय याने पत्रकार परिषद घेत म्हटले आहे


 


रविवारी दिल्लीत सहाव्या टप्प्यात मतदान होणार आहे. मात्र, मतदानापूर्वी केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप झाल्याने 'आप'ला धक्का बसला आहे. त्यामुळे आता अरविंद केजरीवाल यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.


 


Web Title: Ticket sold for 6 crores; The boy of the candidate is very angry with Kejriwal
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.