ध्वजारोहणात चोरट्यांचा धुमाकूळ

By Admin | Updated: July 16, 2015 15:56 IST2015-07-16T15:56:20+5:302015-07-16T15:56:20+5:30

पोलिसांसमोर आव्हान : दीड लाखांचा ऐवज लंपास

Thump of thieves in the ring | ध्वजारोहणात चोरट्यांचा धुमाकूळ

ध्वजारोहणात चोरट्यांचा धुमाकूळ

लिसांसमोर आव्हान : दीड लाखांचा ऐवज लंपास
नाशिक : सिंहस्थ ध्वजारोहणाप्रसंगी आलेल्या तीन भाविकांना चोरट्यांनी दणका दिला असून, तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये सुमारे दीड लाखाचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे़ या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत शंका उपस्थित केली जात असून, आगामी काळात या घटनांवर पोलीस कसे नियंत्रण ठेवणार याबाबत नागरिकांनी शंका व्यक्त केली आहे़
तेलंगणा येथील सिकंदराबाद कुरी येथील रहिवासी सीमा सुमन मन्ने या मंगळवारी (दि.१४) सिंहस्थ ध्वजारोहण कार्यक्रमासाठी रामकुंडावर आल्या असता त्यांच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीचे तीन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले़
दुसरी घटनादेखील रामकुंडावरच घडली़ मुंबईच्या मलबार हिल येथील अजंता बिल्डिंगमधील रहिवासी महेंद्रकुमार बासुदेव झांजरीया हे ध्वजारोहणानंतर रामकुुंडात स्नान करीत असताना त्यांच्याकडील ७० हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली़
तिसर्‍या घटनेत कमोदनगरमधील महिलेचे मंगळसूत्र चोरट्यांनी लाबंविले आहे़ हॅपी होम सोसायटीत राहणार्‍या दीप्ती किशोर पाटील (४७) या रामकुंडामध्ये स्नान करण्यासाठी गेल्या असता चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील २२़५ ग्रॅम वजनाचे ४० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरून नेले़ या तिन्ही प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत़(प्रतिनिधी)

Web Title: Thump of thieves in the ring