आता सरकारी रेशन मिळवण्यासाठी करावे लागणार 'हे' काम; वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 14:49 IST2022-10-21T14:45:59+5:302022-10-21T14:49:14+5:30
रेशन वाटपामध्ये सध्या डिजिटलायझेशन झाले आहे. थंब मशिनवर तुमचे व्हेरिफिकेशन झाल्यनंतर रेशन मिळते. यात सरकारने वेळोवेळी बदल केले आहेत.

आता सरकारी रेशन मिळवण्यासाठी करावे लागणार 'हे' काम; वाचा सविस्तर
रेशन वाटपामध्ये सध्या डिजिटलायझेशन झाले आहे. थंब मशिनवर तुमचे व्हेरिफिकेशन झाल्यनंतर रेशन मिळते. यात सरकारने वेळोवेळी बदल केले आहेत. आता पुन्हा एकदा या प्रक्रियेमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. तुम्ही देखील शिधापत्रिकाधारक असाल आणि तुम्ही सरकारी रेशन योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.
सर्वसामान्यांना मिळणाऱ्या रेशनच्या नियमांमध्ये सरकारने काही बदल केले आहेत. आता रेशन मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना एकदा नव्हे तर दोनवेळा अंगठा लावावा लागणार आहे.मध्य प्रदेश सरकारने हा बदल केला आहे. म्हणजेच रेशन घेण्यासाठी तुम्हाला दोनवेळा अंगठा लावावा लागणार आहे. अन्यथा तुम्हाला रेशन मिळू शकणार नाही. रेशन घ्यायचे असेल तर सरकारने बदललेल्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.
दारिद्र्यरेषेखालील प्रत्येक व्यक्तीला केंद्र आणि मध्य प्रदेश सरकारकडून ५-५ किलो धान्य दिले जाते. लाभार्थ्याला आता केंद्र आणि राज्य सरकारच्या नावावर दोनवेळा अंगठा लावावा लागणार आहे. सध्या वितरण केंद्रावर एकदा अंगठा लावल्यानंतर लाभार्थ्याला रेशन मिळते. ऑक्टोबर महिन्यापासून ही व्यवस्था बदलली आहे. मात्र यामुळे लोकांना रेशन घेताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकणार आहे. दोनवेळा अंगठा लावावा लागणार असल्यामुळे रेशन वाटपात गोंधळ उडणार आहे.
केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणाऱ्या रेशनसाठी आता लाभार्थ्यांना दोनदा स्वतंत्रपणे अंगठा लावावा लागणार आहे. मध्य प्रदेश सरकारने केलेला हा नियम राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात लागू करण्यात आला आहे. या तरतुदीनंतर दुकानचालकांना रेशन वितरणात पूर्वीपेक्षा जास्त वेळ लागेल.
हेल्मेट घातले नसेल, दारू प्यायलात तर सुरू नाही होणार बाइक; इंजिनीअर युवकाचा उपक्रम