महिलांवरील थरकाप ़़़़ जोड ़़़
By Admin | Updated: April 4, 2015 01:55 IST2015-04-04T01:55:06+5:302015-04-04T01:55:06+5:30
प्रतिक्रिया़़़

महिलांवरील थरकाप ़़़़ जोड ़़़
प रतिक्रिया़़़जनजागृतीमुळे गुन्ांची नोंद करण्यासाठी महिला पुढे येत आहेत़़़लातूरच्या पोलिस दलातील गृह विभागाच्या उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ़ अश्विनी पाटील म्हणाल्या की, घटना यापूर्वीही घडत होत्या़ परंतु बदनामीच्या भितीने व कायद्याचे अज्ञान असल्यामुळे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी होते़ जनजागृती झाल्यामुळे व कायद्यात केलेल्या बदलामुळे पिडीत महिला त्यांच्या अत्याचारावरील गुन्ांची नोंद करण्यासाठी पुढे येत आहेत़ पोलिसांकडून न्याय मिळेल, असा आशावाद महिलांना वाटतो आहे़ तसेच महिलांच्या घटनेतील नोंदीबाबत महिला व मुलींचे नाव गुपीत ठेवण्याचे कायद्याचे अभय असल्यामुळे महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत़ टीव्ही संस्कृती आणि मोबाईलचा वापर चांगला जितका तितका वाईटही आहे़ तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करायचा, हे ज्यांनी त्यांनी ठरविले पाहिजे़ तंत्रज्ञानाचा योग्य वापर हितकारक असतो़ परंतु गैरवापर महिलांसाठी धोकादायक ठरत असल्याचेही त्या म्हणाल्या़ संशयाचे भूत डोक्यात़़़स्वयंसिद्धा महिला मंडळाच्या अध्यक्षा ॲड़ स्मिता परचुरे म्हणाल्या, महिलांच्या खुनांच्या घटना पाहिल्यास बहुतांश खून हुंडाबळीशी निगडीत असल्याचे दिसून येते़ त्यातही महिलांच्या चारित्र्याबाबत संशयाचे भूत डोक्यात असल्यामुळे व लहानसहान कारणावरुन अनेक महिलांना प्राणास मुकावे लागले आहे़ मानपान व आर्थिक मागण्यांवरुनही महिलांचा नाहक छळ होतो़ सार्वजनिक ठिकाणी महिलांची सुरक्षा धोक्यात आहे़ भोगलालसा वाढल्याने आणि निराधार, निराश्रीत महिलांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याची मानसिकता वाढल्याने महिलांवरील अत्याचार वाढले आहेत़ समाजातील विकृतींवर अंकूश ठेवणे गरजेचे आहे़ आई-वडीलांनी मुलींशी सुसंवाद ठेवून सार्वजनीक ठिकाणी तिच्या सुरक्षीततेवर लक्ष ठेवले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या़ अत्याचाराचा आलेख़़़ व लोगो सोबतच्या ०२ पंकज या फाईलमध्ये देत आहोत़