शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

बिहारमध्ये जन-गन-मन यात्रेवर 8 वेळा दगडफेक अन् आता कन्हैया कुमारवर फेकली चप्पल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 8:14 PM

एनआरसी आणि सीएएविरोधात कन्हैयाने 'जन-गण-मन' यात्रा काढली आहे. एका महिन्याच्या या कालावधीत ते बिहारमधील बहुतेक सर्व प्रमुख शहरांमध्ये भेट देणार आहे.

ठळक मुद्देएनआरसी आणि सीएएविरोधात कन्हैयाची 'जन-गण-मन' यात्राबिहारमध्ये कन्हैया कुमार 50 सभा घेणार कन्हैया कुमार यांना देशात दंगल भडकवायची आहे, चप्पल फेकणाऱ्याचा आरोप

पटणा - बिहारमध्ये पुन्हा एकदा जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) च्या छात्रसंघाचे माजी अध्यक्ष आणि माकपचे नेते कन्हैया कुमार यांना विरोधाचा सामना करावा लागला आहे. कन्हैया यांची जन गण मन यात्रा लखीसराय येथे पोहचल्यानंतर कन्हैयाच्या सभेदरम्यान मंचावर चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला. चप्पल स्टेजवर पोहोचली नाही. दरम्यान, कार्यकर्त्यांनी आरोपी युवकाला पकडून जोरदार मारहाण केली. 

कन्हैया कुमार यांच्या बिहार येथील यात्रेवर आतापर्यंत 8 वेळा दगडफेक करण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्हैया आपल्या पूर्वनिर्धारित कार्यक्रमानुसार गांधी मैदान येथे आयोजित मेळाव्याला संबोधित करताना प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका तरूणाने मंचावर चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला. पण ही चप्पल स्टेजपर्यंत पोहचू शकत नाही. मात्र यावेळी काही कार्यकर्त्यांनी आरोपी तरूणाला पकडून जोरदार मारहाण केली. बऱ्याच प्रयत्नानंतर पोलिसांनी जमावापासून तरूणांना वाचवले आणि ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. कन्हैया कुमार यांच्या दिशेने चप्पल फेकणाऱ्या युवकाचे नाव चंदन कुमार असे आहे.

आरामध्येही यात्रेवर दगडफेक चंदनने सांगितले की, कन्हैया कुमार यांना देशात दंगल भडकवायची आहे. डाव्यांची विचारसरणी कधीही चालणार नाही असं सांगत मी देशभक्त आहे असं तो म्हणाला. याआधी शुक्रवारी कन्हैयाच्या ताफ्यावरही आरा येथे दगडफेक करण्यात आली होती, त्यात अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे.

कन्हैया कुमार बिहारमध्ये घेणार 50 सभा एनआरसी आणि सीएएविरोधात कन्हैयाने 'जन-गण-मन' यात्रा काढली आहे. एका महिन्याच्या या कालावधीत ते बिहारमधील बहुतेक सर्व प्रमुख शहरांमध्ये भेट देणार आहे. सुमारे 50 सभा बिहारमध्ये होणार आहे. कन्हैयाने 30 जानेवारी रोजी बेतियाहून हा यात्रेला सुरुवात केली. 29 फेब्रुवारीला त्यांची यात्रा संपणार आहे. यापूर्वी कन्हैयाच्या ताफ्यावर जमुई, सुपौल, कटिहारसह अनेक भागात हल्ला झाला आहे. 

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमारBiharबिहारcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of Citizensएनआरसी