तिघांची एकास मारहाण; चेन व रोकड पळविली

By Admin | Updated: February 8, 2016 02:15 IST2016-02-08T02:15:01+5:302016-02-08T02:15:01+5:30

सोलापूर : तिघांनी मिळून एकास मारहाण करुन सोन्याची चेन व रोकड पळविल्याची घटना अँचिव्हर्स मंगल कार्यालयासमोर शनिवारी घडली.

Three of them beaten up; Chain and cash ran | तिघांची एकास मारहाण; चेन व रोकड पळविली

तिघांची एकास मारहाण; चेन व रोकड पळविली

लापूर : तिघांनी मिळून एकास मारहाण करुन सोन्याची चेन व रोकड पळविल्याची घटना अँचिव्हर्स मंगल कार्यालयासमोर शनिवारी घडली.
शोएब कुतूब पटेल (वय 23, लष्कर, चुना भ?ी, सोलापूर ) याच्या फिर्यादीवरुन जेलरोड पोलीस ठाण्यात वसीम शेख (वय 28), वाहीद शेख (25), बशीर निसार शेख (वय 21, सर्व रा. राहुल गांधी झोपडप?ी) व इतर अनोळखी तीन इसम यांच्याविरुध्द जेलरोड पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादीच्या मोटरसायकलीस वरील आरोपींनी रिक्षाची धडक दिली. त्यानंतर फिर्यादीने त्यांना रिक्षा चालवता येत नाही का असे विचारले असता, त्यास शिवीगाळ व मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चेन व 5 हजार रुपयांची रोकड, मोबाईल काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Three of them beaten up; Chain and cash ran