शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त राफेल विमानं भारतात; हवाई दलाच्या वैमानिकांकडून सराव सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 08:43 IST

ग्वाल्हेरमधील हवाई तळावर तीन राफेल विमानं दाखल

ग्वाल्हेर: राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणावरुन काँग्रेसनं मोदी सरकारला अडचणीत आणलं असताना पहिल्यांदाच ही विमानं भारतात दाखल झाली आहेत. तीन राफेल विमानं सध्या ग्वाल्हेरच्या हवाई तळावर असून ती पुढील तीन दिवस भारतात असतील. या तीन दिवसांत भारतीय हवाई दलाचे वैमानिक राफेल विमान चालवण्याचं प्रशिक्षण घेणार आहेत. फ्रान्सच्या हवाई दलातील तीन राफेल विमानं एका आंतरराष्ट्रीय युद्धाभ्यासासाठी ऑस्ट्रेलियाला गेली होती. ही विमानं मायदेशी परतताना ग्वाल्हेरमध्ये थांबली. या युद्धाभ्यासात भारतीय हवाई दलानंही सहभाग घेतला होता. यानंतर फ्रान्सच्या हवाई दलानं राफेल विमानं भारतात उतरवली. पुढील तीन दिवस ही विमानं ग्वाल्हेरमधील हवाई दलाच्या तळावर असतील. भारतीय हवाई दलाचे वैमानिक या विमानांवर सराव करतील. तर फ्रान्सच्या हवाई दलाचे वैमानिक मिराज-2000 विमान उडवण्याचं प्रशिक्षण घेतील. ऑस्ट्रेलियात आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय युद्धाभ्यासामध्ये भारतीय हवाई दलाच्या सुखोई-30 आणि वाहतूक विमानांनी सहभाग घेतला होता. या युद्धाभ्यासानंतर भारतीय हवाई दलाची विमानं माघारी परतली. यानंतर आता भारत आणि फ्रान्सचे वैमानिक ग्वाल्हेरमध्ये युद्धाभ्यास करतील. फ्रान्सच्या वैमानिकांकडून भारतीय वैमानिकांना राफेल विमान उडवण्याचं प्रशिक्षण दिलं जाईल. भारतानं फ्रान्सच्या डसॉल्ट कंपनीकडून राफेल विमानं खरेदी केली आहेत. ही विमानं लवकरच भारतात दाखल होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाचे वैमानिक राफेल विमान चालवण्याचं प्रशिक्षण घेत आहेत. सप्टेंबर 2019 पर्यंत भारतात 36 राफेल विमानं दाखल होतील, अशी आशा भारतीय हवाई दलाला आहे.  

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलFranceफ्रान्सNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसindian air forceभारतीय हवाई दल